माझ्याबद्दलमी नामदेव अंजनामूळचा रायगडमधील रोहा तालुक्यातील. रोहापासून 14-15 किलोमीटर अंतरावर मुरुडच्या दिशेने माझं गाव. बारशेत नावाचं. डोंगराच्या उतारावर मध्यभागी वसलेलं एक खेडेगाव. फार फार तर 500 लोकसंख्येचं गाव. त्यातही बहुतेकजण मुंबईत आलेत. तिथेच स्थायिक झालेत. गावात फक्त घरं आणि म्हातारी.

गावाकडून मुंबईत आलोय. आधी शिक्षणासाठी. मग इथेच नोकरी लागलीय. सो आता इथेच राहतोय. भाड्याने. मुंबईत आल्यापासून चाळीत राहतोय. त्यामुळे माणसं भेटतात. बिल्डिंगसारखं नाहीय. तिथे दारं बंद असतात. चाळीत तसं नसतं.

कामाबाबत सांगायचं तरतसा मी पत्रकार. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सहाय्यक निर्माता म्हणून काम करतोय. वेबसाईट विभागात आहे. सोशल मीडिया आणि वेबसाईट हँडल करणाऱ्या टीममध्ये आहे.

बाकी लेखन सुरु असतं. या ब्लॉगवरुन लिहितो. फेसबुक आणि ट्विटरवर कायम अॅक्टिव्ह असतो. शिवायवेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्येही अधून-मधून लिहितो. आळस करतो. म्हणून कदाचित लिखाणात सातत्य नसावं. ते सातत्य आणण्याचा प्रयत्न करतोय. बघू जमतंय का ते.

गावाकडील आठवणीचालू घडामोडींवरील विश्लेषणव्यक्तीचित्रणपुस्तक परीक्षण वगैरे या ब्लॉगमधून मांडण्याचा प्रयत्न करतोय.

आणि होसर्वात महत्त्वाचं म्हणजे यावरील लेखांमधील मतं ही माझी वैयक्तिक आहेत. त्यामुळे एबीपी माझाशी त्या मतांचा संबंध नाही.

धन्यवाद!

Popular posts from this blog

पवारांचं डोकं ठिकाणावर आहे का?

लाल डब्यातील रावतेशही

'हे' दोघे आता काय करतात?