ब्लॅक आऊटकेवळ 56 सेकंदांची जाहिरात. साधारणतः जाहिरातीचा अॅव्हरेज टाईम तीस ते चाळीस सेकंदाचा असतो. त्या तुलनेत 'ब्लॅक आऊट' तशी मोठ्या लांबीची म्हणायला हवी. पण पाहताना असे वाटते की, ही जाहिरात अजून मोठ्या लांबीची का नाही? किंबहुना शॉर्टफिल्म का नाही? पण कदाचित कमी वेळेची बनवली गेलीय, म्हणून तिचा दर्जा टिकून आहे.

कोणतीही गोष्ट कमीत कमी शब्दात लिहिणे अवघड असते, तसेच दृकश्राव्य माध्यमाचे आहे. तिथेही कमीत कमी वेळेत एखादा संदेश पोहोचवणे मोठं कठीण काम. कधी कधी अडीच-तीन तासांचा अवधी सुद्धा कमी पडतो. असे असताना 'ब्लॅक आऊट' ही जाहिरात एका मिनिटात कित्येक सिनेमे ओवाळून टाकावे एवढा खणखणीत संदेश देऊन जाते.
  
नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंडया संस्थेसाठी ही जाहिरात तयार केली गेली होती. स्टोरी अगदी साधी सोपी आहे. मात्र ती सुचण्यास तितकेच सृजनशील कल्पकतेचे डोके हवे.

56 सेकंदांची जाहिरात. बिल्डिंग मधील जिन्या वरुन एकजण उतरत असतो. 11 व्या सेकंदाला लाईट जाते. संपूर्ण स्क्रीन ब्लॅक होते. थेट 37 व्या सेकंदाला स्क्रीनवर चित्र दिसते. मध्ये काय होते? तर तो जिन्या वरुन उतरणारा माणूस धडपडतो. ये लाईट को भी अभी..असे म्हणत ती व्यक्ती धडपडते. तितक्यात त्याच अंधारात कुणीतरी एकजण येतो आणि त्या धडपडलेल्या व्यक्तीला दरवाजापर्यंत पोहोचवतो.

जाहिरातीच्या 37 व्या सेकंदाला ज्यावेळी लाईट येते, त्यावेळी प्रेक्षक म्हणून आणि माणूस म्हणून आपण हादरुन जातो. त्यावेळी स्क्रीनवर असे चित्र असते की, त्या धडपडणाऱ्या माणसाला त्या अंधारातून दरवाजापर्यंत सोडणारी व्यक्ती अंध असते. तो धडपडणारा माणूस त्या व्यक्तीला थँक्यूम्हणतो, तेवढ्यात आपल्याला दरवाजापर्यंत पोहोचवणारी व्यक्ती अंध असल्याचे कळते आणि तो आवाक होतो. अंध व्यक्ती टेक केअर आम्हणून पुढे निघून जाते.

अंधारात चाचपडणाऱ्या एका दृष्टी असलेल्या माणसाला एका अंध माणसाने मदत केलेली असते. किती कमी कालावधीत किती मोठा संदेश दिलाय ‘Learn to See’

अभिनय देव यांनी ही जाहिरात दिग्दर्शित केलीय. अभिनय देव म्हणजे रमेश देव यांचा धाकटा मुलगा. आणि आपल्या अजिंक्य देव यांचा धाकटा भाऊ. प्रसिद्धीपासून चार हात लांब राहून आपल्या कलात्मक सृजनशीलतेला वाव देणारा हा माणूस सिनेमांच्या मुख्य प्रवाहात का नाही, असे कायम वाटत आलेय. वन ऑफ द मोस्ट क्रिएटिव्ह पर्सन.

सर्फ एक्सेलच्या 'दाग अच्छे हैं' कँपेनवाल्या जाहिराती असोत वा 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या जाहिराती असोत, किंवा नाईके, मोटोरोला... सर्वच एकास एक भन्नाट आहेत. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता तीस-चाळीस सेकंदात काठोकाठ भरण्याची हातोटी अभिनय देव यांच्यात आहे.

मध्यंतरी देल्ही बेल्ली, गेम प्लॅन, फोर्स 2, ब्लॅकमेल यांसारखे सिनेमे अभिनय देव यांनी दिग्दर्शित केले. पुढेही त्यांनी असे सिनेमे करायला हवेत. आयटम साँगच्या जीवावर सिनेमे चालतील, या आशेने सिनेमे बनवणाऱ्यांनी सिनेमा या कलेलाच एक आयटम साँग करुन टाकलंय. अशा भाऊगर्दीत अभिनय देव यांच्यासारख्या माणसाने आपल्या सृजनशील कल्पनांनी वेगळे प्रयोग करायला हवेत. सिनेमाचा दर्जा टिकेलच, सोबत संपूर्ण क्षेत्राचा दर्जा वाढण्यासही मदत होईल. असो.

जाता जाता... साठ्ये कॉलेजला असताना, जाहिरात विषय शिकवण्यासाठी अभिनय देव आले होते. एक तासाचा एक लेक्चर घेतला होता. त्यावेळी त्यांना जवळून ऐकता आले होते. भारी माणूस आहे एकंदरीत. क्रिएटिवव्हीटी खच्चून भरलीय या माणसात.

'ब्लॅक आऊट' :


No comments

Powered by Blogger.