Posts

Showing posts from February, 2018

प्रिय साथी अस्मा..

Image
काल अस्मा गेली. सॉरी अरे-तुरे करतोय. पण आपल्या जवळच्या माणसाला आपण अरे-तुरेच तर करतो. नाही का? अस्मा वैचारिकदृष्ट्या जवळचीच. तर अस्माच्या जाण्याने काय एवढा फरक पडतो, असे कुणालाही वाटून जाईल. पण फरक पडतो. कारण मानवतावादी चळवळीत अत्यंत महत्त्वाच्या स्थानी अस्मा उभी होती. निडरपणे आणि निर्भिडपणे.
अगदी १५ दिवसांपूर्वीच २७ जानेवारीला तिने ६७ व्या वर्षात पदार्पण केले होते. ५२ साली जमलेल्या या रणरागिणीने ऐन तारुण्यात चळवळीत झोकून दिले. केवळ रस्त्यावरची लढाई नव्हे, तर न्यायालयीन लढाई सुद्धा तिने लढली. ती पेशाने वकील होती.
पाकिस्तानसारख्या लोकशाहीच्या नावाखाली कधी दडपशाही, कधी एकाधिकारशाही, तर कधी लष्करशाही गाजवणाऱ्या देशात लोकशाही टिकून राहावी म्हणून तिने आवाज बुलंद केला.
भारतात जसे अल्पसंख्यांकांचे प्रश्न लाऊन धरल्यावर मुस्लिमांचे लांगुलचालन केल्याचा आरोप होतो, तसा पाकिस्तानात अस्मावर हिंदूंबाबत झाला. एकंदरीत इकडचे आणि तिकडचे कट्टर सारखेच. असो. पण अस्माने कधीच माघार घेतली नाही. ती कमकुवत घटकांची आवाज बनली आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टींविरोधात पेटून उठली.
बहिण हिना गिलानी हिच्यासोबत सुरु …

शॉर्टफिल्म : 2 + 2 = 5

Image
बबाक अन्वारीची 'टू प्लस टू इज इक्वल टू फाईव्ह' ही अप्रतिम शॉर्ट फिल्म पाहिली. मोजून आठ मिनिटांची शॉर्ट फिल्म. वास्तवाला कट टू कट रिलेट करणारी. किंवा असं म्हणूया, कट्टरतावादी, वर्चस्ववादी आणि हुकुमशाही व्यवस्थांच्या पाऊलखुणांचा नेमका वेध घेण्याचा यशस्वी प्रयत्न या शॉर्ट फिल्ममध्ये केला आहे.
आठ मिनिटांच्या शॉर्ट फिल्मची सुरुवात 10 व्या सेकंदाला एका ब्लँक फळ्याला कॅमेरा झूम आऊट करत होते आणि 6 मिनिट 42 व्या सेकंदाला विचारांचं चक्र सुरु करणारा एक डार्क ब्लॅक स्क्रीन येऊन शॉर्ट फिल्म संपते.
ही इराणी शॉर्ट फिल्म असून, पारसी भाषेतील संवाद आहेत. मात्र संपूर्ण शॉर्ट फिल्मला इंग्रजी सबटायटल्स आहेत. अर्थात, सबटायटल्स नसते, तरी फिल्म समजू शकते, इतके ताकदवान दृश्य आहेत. मी पहिल्यांदा सबटायटल्स न वाचता पाहिली, नंतर काही एका ठिकाणचे संवाद समजणे गरजेचे होते म्हणून पुन्हा पाहिली.
एका शाळेच्या एका वर्गातील चार भिंतीत फिल्मचं कथानक आहे. एका गणिताभोवती संपूर्ण कथानक फिरतं. इतकं साधं असलं, तरी त्यामागील अर्थ नि संदेश क्रांतिकारी आहे.
संपूर्ण फिल्ममध्ये कुठेही कुठल्यादी देश किंवा प्रदेशाचा उल्लेख न…

होय, मी 'फुरोगामी' आहे!

Image
गेले काही दिवस पाहतोय. काही महिने खरंतर. 'फुरोगामी' शब्दाची चलती वाढलीय. जगाच्या बेरीज-वजाबाक्या नुकतंच कळू लागलेल्यांना वाटावं की, 'फुरोगामी' हा शब्द 'पुरोगामी' शब्दाला समानार्थी शब्दच आहे की काय. इतका विकृत आणि प्रदूषित प्रचार केला गेलाय. यात शिकले-सवरलेले आघाडीवर आहेत, हे वेगळं सांगायला नको. कारण असल्या उचापत्या सर्वसामान्यांच्या आवाक्यातले नसतात. तर असो. मुद्दा तो नाही. त्याही पलिकडचा आहे.

पुरोगामी... ज्याला इंग्रजीत बहुधा प्रोग्रेसिव्ह म्हणतात. या शब्दाच्या व्याख्येत मला शिरायचं नाही. म्हणजे 'द वर्ड प्रोग्रेसिव्ह डिराईव्ह्ड फ्रॉम लॅटिन वर्ड अमूक-तमूक' असल्या व्याख्या इथे द्यायच्या नाहीत. मला या शब्दातला आशय महत्त्वाचा वाटतो. मी त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करेन. जमेल तसा.

पुरोगामी शब्दाने कितीतरी मोठा अर्थ स्वत:त सामावून घेतलाय. आपल्या विचारांनी आणि त्या विचारांच्या कृतीतून आपल्या भोवतालात योग्य बदल घडवणार्‍या कित्येकांनी मोठ्या अभिमानाने स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेतलंय. आणि पुरोगमी असल्याची ओळख ठेवणीतल्या दागिन्यांप्रमाणे जीवापाड जपलीय.

वर्षांम…

श्रेय ज्याचे त्यास द्यावे..

Image
सह्याद्रीच्या पर्वतरांगा, चहूबाजूला गर्द झाडी, डोंगराच्या मध्यभागी नारळाच्या झाडांनी वेढलेलं तीस ते पस्तीस उंबरठ्यांचं चिमुकलं गाव, गावाच्या वेशीवर एक पार, मस्त रुंद चौथरा... डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यातला एखादा दिवस, त्या दिवसाची दुपार थोडी संध्याकाळकडे झुकलेली, साडेतीन-चार वाजण्याचा सुमार.... एकंदरीत चहूबाजूंना प्रसन्न वातावरण.

अशा नितांत सुंदर निवांत वेळी आपण दोन-चार सवंगड्यांसोबत हलक्या-फुलक्या गप्पा मारत पारावर बसलेलो असावं, अनं सवंगड्यांपैकी कुणीतरी त्याच्या आयुष्यातल्या कडू-गोड आठवणी सांगाव्यात. अगदी सहज, सोप्या भाषेत आणि प्रेमळ सुरात... वाह!

कसलं भारी ना? सारं कसं स्वप्नवत!

माधुरी अरुण शेवते यांचं ‘श्रेय ज्याचे त्यास द्यावे’ हे पुस्तक वाचताना असंच काहीसं वाटलं. माझ्या धावपळीच्या वेळातून निवांत क्षण या पुस्तकासाठी ठेवले होते. त्यामुळे शांततेत या पुस्तकाचा रोमँटिसिझम अनुभवता आला.

लेखिका अगदी सहजतेने एक एक प्रसंग उलगडत जाते. वाचत असताना एका क्षणी आपण पारावर निवांत बसून माधुरी शेवतेंच्या तोंडून हे किस्से ऐकतोय की काय, असं वाटून जातं. इतकं त्यांच्या लेखनात गुडूप व्हायला होतं आणि प्र…

पवारांचं डोकं ठिकाणावर आहे का?

Image
पवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला 'पवारांचा माणूस' म्हणतात. पण ते किती खोटे आहे, हे माझं मला माहित आहे. कारण माझं समर्थन हे विषयागणिक बदलत जातं. एखाद्या विषयावर ज्याची भूमिका योग्य, त्याच्या बाजूने राहणं मला पटतं. पवारांबाबतही तसेच आहे. पण आज त्यांच्या भाषणाने कहर केला. पवारांसारख्या 'जाणत्या' नेत्याकडून अशा भूमिकेची अजिबात अपेक्षा नव्हती. किमान आजच्या विखारी स्थितीच्या काळात तरी.
पवारांच्या भाषणातील ज्या मुद्द्यावर माझा पुढील संपूर्ण लेख अवलंबून आहे, तो मुद्दा नक्की काय आहे, पवार नेमकं काय म्हणाले हे प्रथम पाहूया.
औरंगाबादमधील हल्लाबोल यात्रेच्या सभेत पवार म्हणाले, “ट्रिपल तलाक. माझं स्वच्छ मत असंय, भगिनींना संरक्षण द्यायचा विचार असेल, तर मुस्लिम समाजातील प्रमुख लोकांना विश्वासात घेऊन, धर्मगुरुंना विश्वासात घेऊन, काय पाऊल टाकायचे ते टाकता येईल. पण तलाक हा इस्लामच्या माध्यमातून एक दिलेला मार्ग आहे, संदेश आहे. आणि त्या संदेशामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कुठल्याही राज्यकर्त्याला नाहीय. तुम्ही त्या ठिकाणी हस्तक्षेप करता याचा अर्थ एका धर्माच्या लोकांना …

आपण फक्त एवढंच करुया...

Image
काल गांधींबद्दल काहीच लिहिले नाही. कारण गांधीवादी आणि गांधी विरोधक अशा दोन्हीकडून रणकंदन सुरु होतं. एकीकडे गांधी पटवून देण्याची धडपड दिसली, दुसरीकडे गांधींना चूक ठरवण्याचीही धडपड दिसली. मुळात गांधी पटवून देण्याची गोष्ट नाही. विवेकी आणि शांतताप्रिय माणसाला गांधी पटतोच. आणि चूक ठरवण्याची धडपड तर गांधी असल्यापासूनची आहे. त्यावर न बोललेलेच बरे.
प्रश्न असा आहे की, गांधींचा विरोध करता करता, अन् नथुराम गोडसेचं समर्थन करता करता, अनेकजण वधाच्या नावाखाली हत्येचं सुद्धा समर्थन करत आहेत. आपण इतक्या विखारात अन् असंस्कृत देशात वावरतो आहोत का, जिथे हत्येचं इतक्या उघडपणे समर्थन केले जाते?
गांधी की गोडसे हा वादाचा विषय कसा होऊ शकतो? निशस्त्र वृद्धाची हत्या करणाऱ्याला सहानुभूती कशी दिली जाऊ शकते? दिली जात असेल, तर सहानुभूतीदारांच्या मेंदूच्या तपासणीची नितांत गरज आहे. कारण हे मेंदू देशाला हिंसेच्या खाईत लोटण्याची शक्यता आहे.
प्राध्यापक संतोष शेणई सरांचं एक वाक्य मला आठवतंय. मागे एका ग्रुपवर चर्चा सुरु असताना त्यांनी गांधी-गोडसे वादावर छान वाक्य वापरलं होतं. ते म्हणाले - 'गांधी' हा विचार आहे, त्याची…

संमेलनाच्या नोंदी (भाग चार)

Image
संमेलनाच्या नोंदी लिहीत असताना काहीजणांनी मेसेज करुन विचारले, काय रे यावेळी पुस्तके नाही मिळाली का? तर दोस्त हो, साहित्याच्या प्रांगणात जाऊन रिकाम्या हाताने परतेन, असे कसे होईल? महानगर साहित्य संमेलनातूनही माझ्या किताबखान्यात अनेक मित्र आले.
यावेळी थोडं वेगळं घडलं, जेवढी पुस्तके खरेदी केली, त्यापेक्षा जास्त भेट म्हणून मिळाली. भेट मिळाल्या पुस्तकांचा आनंद वेगळा असतो. पैसे द्यावे लागले नाहीत म्हणून नव्हे, तर भेट मिळालेल्या पुस्तकांसोबत देणाऱ्यांच्या आठवणीही आपल्या किताबखान्यात येतात.
महानगर साहित्य संमेलनात ग्रंथ प्रदर्शन नव्हते. पण दोन टेबलांवर काही पुस्तके विक्रीस होती. तिथेही दोन चार साहित्यिकांचीच. ती खरेदी केली.
संमेलनाहून परत येताना बॅगमध्ये एकूण ८ पुस्तके आणि १ दिवाळी अंक असा ऐवज होता. प्रत्येक पुस्तकाबद्दल थोडक्यात :
▪️हरवल्या आवाजाची फिर्याद - कवी मित्र नामदेव कोळी यांनी रावसाहेब कुवर यांचा हा कविता संग्रह भेट दिला. यातील एक कविता मी याआधी येशू पाटील सरांच्या मुक्त शब्दमध्ये वाचली होती. आता संपूर्ण संग्रह वाचता येईल. योगायोग म्हणजे आजच या पुस्तकाला नामदेव ढसाळांच्या नावाचा पुरस्कार…

संमेलनाच्या नोंदी (भाग तीन)

Image
चंद्र-सूर्य-तारे यांच्या पलीकडे जात, आपल्या कवितेतून ठाम अशी भूमिका घेत, आपल्या आणि समाजाच्या जगण्यातील खाच खळगे, भोवतालाचे पडसाद इत्यादी गोष्टी नीरजा यांच्या कवितेचं आशय सूत्र. किंवा त्यांच्या कवितेतून डोकावतात, नव्हे स्पष्टपणे जाणवतात. अशा संवेदनशील आणि पुरोगामी विचारांच्या कवयित्रेचा लळा माझ्यासारख्या तरुण वाचकाला लागणार नाही, असे कसे होईल?
महानगर साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी संमेलनाच्या स्वागताध्यक्षा सुजाता पाटील म्हणाल्या, “ज्यांच्यामुळे मी साहित्यिक म्हणून घडले, त्या नीरजा यांनी इथे उपस्थिती लावल्याने मला प्रचंड आनंद होतोय.” खरंतर माझ्याही भावना तशाच होत्या. महानगर साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे नीरजा यांना ऐकण्याची संधी मिळणार होती. नुसते विचार नव्हे, त्यांची कविता त्यांच्याच तोंडून ऐकण्याची संधी मिळाली.
मी ज्या जिल्ह्यातून येतो, त्या रायगडची ओळख सांगताना ज्यांची नावं पटकन सांगतो, त्यात एक नाव कवयित्री नीरजा यांचेही असते.
नीरजा यांनी महानगर मराठी साहित्य संमेलनात कवितांच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवले. नावाला अध्यक्षपद खांद्यावर न घेता, ज्या कव…

संमेलनाच्या नोंदी (भाग दोन)

Image
एखाद्या साहित्य संमेलनाला ज्यावेळी उपस्थिती लावण्याचं ठरवतो, त्यावेळी अर्थात तिथून काहीतरी वैचारिक खाद्य मिळेल, हीच पहिली अपेक्षा असते. किमान माझी तरी. आणि मुंबईतून दोन-अडीच तासांचा प्रवास करुन अलिबागला जायचं, दिवसभर संमेलन अटेन्ड करायचं, म्हटल्यास विषयही तसे हवे असतात. सुदैवाने तसेच विषय होते.
महानगर साहित्य संमेलनात तीन वैचारिक खाद्य देणारे कार्यक्रम मी अटेन्ड केले. त्यातील पहिल्या कार्यक्रमाची काही टिपणं काढली. ती इथे मांडतो. विषय असा होता की, 'समाजमाध्यमं आणि वाचनसंस्कृती'. श्रीरंजन आवटे, राही पाटील, आदित्य दवणे, जयंत धुळप यांनी यात सहभाग घेतला होता. आणि समीरण वाळवेकर या परिसंवादाचे अध्यक्ष होते.
समाज माध्यमं आणि वाचनसंस्कृती - हा विषय तसा खोल आहे. समाज माध्यमं येऊन अगदी आठ-दहा वर्षांचा कालावधीच लोटला असला, तरी त्याच्या प्रसाराचा वेग तुफान आहे. याच परिसंवादाच्या सुरुवातीला समीरण सरांनी यासंदर्भात अत्यंत नेमक्या शब्दात मांडणी केली. ते म्हणाले, माध्यमक्रांतीला कमी कालावधीत कित्येक मैल पुढे नेण्यात समाज माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. मला हे अगदी पटलं. कारण इतर कोणत्याही माध्…

संमेलनाच्या नोंदी (भाग एक)

Image
मुंबई मराठी साहित्य संघ आणि साहित्य रसिक (अलिबाग) अशा दोन संस्थांनी मिळून अलिबागमधील कुरुळ येथे ४३ वे महानगर मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. सुजाता आणि प्रसाद पाटील या दोन साहित्यिक-साहित्यप्रेमींनी आयोजन-नियोजन-संयोजनाची धुरा सांभाळली. तीही अत्यंत यशस्वीपणे.
चार महत्त्वाचे कार्यक्रम यात झाले. बाळ फोंडकेंचं अध्यक्षीय भाषण, समाजमाध्यमं आणि वाचनसंस्कृती या विषयावर परिसंवाद, संवेदनशील दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा आणि कविता सादरीकरण.
अलिबागला उशिरा पोहोचल्याने बाळ फोंडकेंचं अध्यक्षीय भाषण काही ऐकता आलं नाही. मात्र अध्यक्षीय भाषणातून जी अपेक्षा असते, ती कवितांच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या कवयित्री नीरजा यांनी भरुन काढली. अत्यंत धाडसी भाषण त्यांनी जाहीर व्यासपीठावरुन केले. त्यावर पुढे लिहिणारच आहे.
समाजमाध्यमं आणि वाचनसंस्कृती यावरील परिसंवादात श्रीरंजन आवटे, आदित्य दवणे, राही पाटील, जयंत धुळप सहभागी होते. समीरण वाळवेकरांनी परिसंवादाचं अध्यक्षपद भूषवलं. यात श्रीरंजनचं भाषण विशेषत्वाने आवडलं. चारही सहभागी वक्त्यांचं आणि अध्यक्ष वाळवेकर सरांचे मुद्द…

किसी के बाप का हिन्दोस्तान थोड़ी है...

Image
काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाला सहाव्या रांगेत बसवलं गेलं. हे निषेधार्ह तर आहेच. त्याचवेळी सत्ताधाऱ्यांच्या मुजोर अन् अहंकारी मानसिकतेचं नागडं रुप दाखवणारं आहे. सत्तेत इतके मंत्रीही नाहीत, की पहिली रांग भरुन जावी. एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षासाठी पहिल्या रांगेत खुर्ची मिळू नये?
त्यात आणखी एक मुद्दा असाय की, राहुल गांधींकडे शासकीय पद नाही. मात्र मग त्यावेळी प्रश्न असा येतो की, अमित शाहांकडे कोणतं शासकीय पद आहे, जेणेकरुन त्यांना पहिल्या रांगेतील खुर्ची बहाल करण्यात आली?
आणि तसेही एरवी प्रोटोकॉलची ऐशी-तैशी करुन कुठल्याही ऐऱ्या-गैऱ्या राष्ट्रांच्या अध्यक्षांना मिठ्या मारल्या जातात, मग इथे तर आपल्याच देशातील पक्षाचा अध्यक्ष होता ना. इथे असे काय झाले की, पहिल्या रांगेतही स्थान दिले नाही.
असो. मुद्दा केवळ मानसिकतेचाही नाही, तर संस्कार, संस्कृती आणि परंपरेचाही आहे. कारण या गोष्टी केवळ बोलण्याच्या नसतात, त्या आचरणात आणायच्या असतात. मात्र विद्यमान सत्ताधारी केवळ या गोष्टी बोलण्यापुरते ठेवतंय. आचरणाच्या नावाने बोंब आहे. हेही असो.
याही पुढे जात एक गोष्ट भयंकर आहे, ती म्हणजे विरोधी…

प्रिय मित्रा लहू...

Image
लहू मित्रा, गावातल्या लोकांचे चप्पल-बूट शिवलेस, शेळ्या सांभाळल्यास, हॉटेलमध्ये भांडी धुतलीस, एसटीडीवर काम केलेस, विटभट्टीवर बालकामगार म्हणून राबलास, पेपर लाईन टाकलीस, लोकांच्या शेतात ऊस, गहू, कापूस खुरपलास... आणि त्याचवेळी शिक्षण घेतलेस. नुसते शिक्षण घेतले नाहीस, तर बीएड, डीएड, एमए आणि सेट नेट... अशा एकास एक सर करणाऱ्या पदव्या मिळवल्यास.
H.S.C. D.Ed. B.A. B.Ed, CTET, TET, M.A. SET, NET in History, M.A. SET, NET-JRF in Pol. Sci., M.A. Economic, M.A. English - पदव्यांचा पाढा वाचूनच थकायला होतं रे. किती शिकलास आणि अजूनही शिकतोयेस!
जिवलग मित्र लहू कांबळे याच्या शिक्षणाचा आणि संघर्षाचा हा प्रवास. या खडतर प्रवासातून इतरांना शिकण्याची प्रेरणा मिळतेच. मात्र त्याहीपुढे जात, जगण्याची उमेद मिळते. निराशेच्या अंधारात धडपडत असताना, लहूचा प्रवास आठवून सकारात्मकता मिळते.
लहू मित्रा, तू तुझ्या हस्ताक्षराइतका सुंदर मनाचा आहेस. तू मित्र असणे, ही खूप मोठी गोष्ट आहे.
हॉस्टेलमध्ये नुसत्या भातावर दिवस ढकलले असशील, पण जगण्याच्या व्यवहारात तू कधीच उपाशी असल्याचे दाखवले नाहीस. प्रत्येक गोष्टीत आनंद, सकारात्मक…

संघर्षाचं दुसरं नाव : सागर रेड्डी

Image
जन्म झाला आणि आई-वडिलांचं छत्र हरपलं. आंतरजातीय विवाहाच्या रागातून कुटुंबीयांनीच आई-वडिलांना संपवलं. 'सैराट'च्या एन्डसारखी लाईफस्टोरी. मग 12-13 महिन्याचा असताना आजोबांनी त्याला अनाथालयात सोडलं. तिथे तो राहिला. वाढला. एका विशिष्ट आकाराची अनाथालय नावाची चौकट. त्या चौकटीत त्याने आयुष्यातली 18 वर्षे घालवली.
अनाथालय देईल ते खायचं, सांगेल तसं वागायचं, सांगतील ते शिकायचं... स्वातंत्र्य नावाचं पाखरु अनाथालयाच्या आभाळावरुनही कधी उडायचं नाही. अशा चौकटीतलं ते आयुष्य.
मग सरकारी कायद्यान्वये वयाच्या 18 व्या वर्षी बोजा-बिस्तारा गुंडाळायचा आणि अनाथालयातून बाहेर पडायचं. कुठे जाणार, काय करणार, कुठे राहणार, काय खाणार, इतके असंख्य अनुत्तरित प्रश्न घेऊन तो बाहेर पडतो.
लोणावळ्यातील अनाथालयातून 18 वर्षांचा हा मुलगा मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर येतो. दिवस-दिवस फिरतो. मिळालं तर खातो. अन्यथा भुकेल्या पोटी झोपी जातो. अन्न पोटात जात नसलं, तरी विचार मात्र तुफान वेगाने डोक्यात घुमत होते. भिनत होते. नको नको ते विचार डोक्यात डोकावत होते. अगदी आत्महत्या करुन जीवन संपवण्यापर्यंत.
दुसरीकडे, स्वत:ला सिद्ध करण्याच…

पाईपलाईन

Image
लहानपणी कधी मुंबईत एसटीने यायचो, त्यावेळी रस्त्याच्या समांतर जाणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनचे फारच कुतूहल वाटायचे. अत्यंत सहज पळायच्या. एखाद्या सापासारख्या वळवळत. नागमोडी वळणे घेत. गाडीच्या वेगाने सुसाट.
एखाद्या सुंदर मुलीच्या कपाळावरील केसांचा झुपका ज्या लयीत तरंगत असतो ना, तशा लयीत पाईपलाईन दोन छोट्याशा टेकडीवर तरंगताना दिसायच्या. एखाद्या अडवळणाला सहज वळसा घालत आपल्या सोबत पुढल्या प्रवासाला यायच्या.
कधी एखाद्या करवंदीच्या जाळीत लपत छपत, कधी उजाड माळरानावर एकटीच सळसळत... कधी कधी तर सिमेंटच्या भिंतीची बंधनं तोडत बाहेर येणाऱ्या पिंपळाच्या झाडासारखी ती पाईप लाईन कुठल्यातरी कठड्यातून बाहेर यायची... किती कौतुक वाटायचं तिचं!
का धावत येत असेल आपल्यासोबत? कुठे जात असेल ती? कुणाला भेटायला तर जात नसेल? आणि जात असेल, तर कुणाला भेटायला? तिचा कुणी सखा?... नाना प्रश्न पडायचे.
प्रवासात आपल्याला कधी तहान लागेल, म्हणून त्या पाईप लाईन आपल्यासोबत रस्त्याने येत असाव्यात, असेही वाटून जायचे कधी कधी. अन् मग असे वाटून, तिच्याबद्दल प्रचंड आदर वाटायचा, आपुलकी वाटायची.
मग शहर जवळ आलं की, पाईपलाईन गायब व्हायची. …

चला, आधी जात स्वीकारुया.

Image
हिंसाचार हा कधीच कुठल्या पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या राज्याला शोभानीय नाही. भीमा-कोरेगावबाबतही तसेच आहे. त्यात नक्की कोण कोण दोषी आहे, हे येणारा काळ ठरवेलच. किंवा काळ असाही येईल, की दोषी कोण हे ठरवूच दिले जाणार नाही. असो. त्यावर इथे भाष्य करुन मी माझ्या मूळ मुद्द्याला बाजूला सारत नाही. गेल्या चार दिवसात एक गोष्ट मध्यभागी होती, ती म्हणजे जात.
ब्राम्हण विरुद्ध मराठा, दलित विरुद्ध ब्राम्हण, दलित विरुद्ध मराठा, ब्राह्मण विरुद्ध दलित ते अगदी मराठा, दलित विरुद्ध मराठा, ब्राह्मण... जसे ज्याला सूचत होते, त्या त्या दृष्टिकोनातून याकडे जो तो पाहत होता. कुणी आपल्या जातीच्या चष्म्यातून मत नोंदवत होता, कुणी आणखी कुठला चष्मा. पण प्रत्येकजण आपली मतं मांडताना जात सोडत नव्हता.
भीमा कोरेगाव लढाईचा इतिहास आणि त्यावरुन सध्या सुरु असलेला वाद, या वादावर पुढे मागे पडदा पडेलही. पण एक गोष्ट या साऱ्या वादाच्या मध्यभागी आहे, ती म्हणजे जात. आणि ही गोष्ट गेल्या काही दिवसात, इव्हन गेल्या दोन वर्षात जास्त चिघळली आहे. तिचे स्वरुप भयंकर आहे. त्यावर अधिक चर्चेची गरज आहे.
जातीय द्वेष इथल्या समाजात ठासून भरला आहे. गावकुसापा…