Posts

Showing posts from December, 2017

अटेन्शन मिस्टर मोदी...

Image
सेकंड शिफ्टला होतो. 4 ला ऑफिसला पोहोचलो, तेव्हा कळलं की सोशल मीडियावर लिहिणाऱ्यांना नोटीस पाठवल्या गेल्यात. अर्थात काही एकाच केसमधील होत्या. मात्र एका तरुणाला मोदींविरोधात लिहिल्याने नोटीस पाठवली गेली होती. त्यामुळे विषय गंभीर वाटला. मी हळूच माझ्या मोबाईलमधील जीमेल अॅप ओपन केला आणि रिफ्रेश केला. एक नव्हे, दोन-तिनदा. म्हटलं मीही कित्येकवेळा मोदींविरोधात लिहिलंय की. आपल्यालाही नोटीस आलेय का हे चेक केलं. मी साधारणत: आपल्या लिहिण्या-बोलण्यातून अपशब्द टाळतो. अगदीच जीवाभावाचा मित्र असेल, तरच त्याला हायलेव्हल शिव्या देतो. तरीही कधी कुठे अपशब्द वापरला असेलही. म्हणून नोटीसची बातमी कळल्यावर माझ्यासारख्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि इमेल तपासला. आणि हे फक्त माझ्याच बाबतीच झालं असेल असे नाही.

खात्रीने सांगतो, सोशल मीडियावर लिहिणाऱ्या अनेकांनी इमेल तपासले असतील किंवा किमान आपल्यालाही अशी नोटीस येईल की काय, असं तरी एका क्षणी वाटलंच असेल.हे सारं वरचेवर दिसतं तितकं सोपं नाही.

'ठीकंय ना, नोटीस आली, पोलिसांनी डांबून ठेवलं तर नाही ना' टाईप प्रकरणही नाही.

थोडं टोकाचं वाटेल, पण ही डिजिटल आण…

गुडबाय 'कमबॅक मास्टर'....

Image
इंडियन क्रिकेटरने फोर किंवा सिक्स मारल्यावर टाळ्या ठोकायच्या, ओरडायचं.. आऊट झाल्यावर ‘शिटsss’ म्हणत दोन्ही हात डोक्याला पकडून नाराज व्हायचं किंवा आधी सचिन आणि आता धोनी-विराट आऊट झाल्यावर बॉलरला शिव्या हासडायच्या.... इतकंच आपल्याला क्रिकेटमधील कळतं. उगाच खोटं कशाला बोलायचं!
थोडं त्यापुढेही क्रिकेटमधील काही आवडत असेल तर रैनाची डाव्या विचारांकडे झुकणारी मतं आवडतात, धोनीतला संयमीपणा आवडतो, विराटमधला त्याच्या कामगिरीला शोभणारा आक्रमकपणा आवडतो... गंभीरला एकदा आणखी चान्स द्यायला हवा यार, असे म्हणत अनेकदा चुकचुकतोही. वगैरे वगैरे. एवढंच काय ते क्रिकेटबद्दल आगाध (?) ज्ञान. बाकी क्रिकेटबद्दल माझी सगळी बोंबाबोंब. विशेषत: अनेक टेकनिकल गोष्टी कळत नाहीत. असो.
तर सचिनने रिटायरमेंटचा निर्णय, अन् एबी डिव्हिलियर्सने कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी प्रचंड दु:ख झालं होतं. बाकी कधीही क्रिकेटविश्वाशी संबंधित दु:ख झालं नाही. अगदी पाकिस्तानविरोधात मॅच हरल्यावरही. कारण खेळात काहीही होतं, असं वाटतं मला. तरी हे दोन खेळाडू कायच्या काय आवडतात. पण काल लेफ्ट-हँडेड बॉलर आशिष नेहराने रिटायरमेंटची शेवटची मॅच ख…

बेस्ट कंडक्टर ते बेस्ट अॅक्टर

Image
साधारण 1954 किंवा 1955 सालचा किस्सा. एक्झॅक्ट दिवस सांगता येत नाही. पण याच वर्षातला. झालं असं की, एकदा गुरुदत्त आणि चेतन आनंद काहीतरी चर्चा करत बसले होते.
अचानक एक दारुड्या तिथे आला. तो दारुच्या नशेत पार बुडाला होता. काहीही बडबडत होता. इकडून तिकडे-तिकडून इकडे त्याचा तोल जात होता. तिथे बसलेल्या गुरुदत्तला तो दारुड्या इसम धक्के देत होता.
या सर्व प्रकाराचा गुरुदत्तला त्रास झाला. त्याने संतापून बाजूला असलेल्या माणसांना बोलावंल आणि म्हटलं, याला आत्ताच्या आता इथून बाहेर घेऊन जा आणि रस्त्यावर फेकून द्या.
हा सगळा प्रकार हाता-पायावर येईल म्हणून तातडीने तिथे बाजूलाच असलेले बलराज सहानी आले आणि त्या दारुड्याचा हात पकडून उभे राहिले. गुरुदत्त बलराज सहानींच्या चेहऱ्याकडे पाहत उभे होते. अर्थात, एकतर हा दारुड्या त्रास देतोय आणि बलराजजी त्याची बाजू घेतल्यासारखे त्याचा हात पकडून उभे होते. कुणी काही बोलायच्या आतच बलराज सहानींनी सांगितलं, हा दारु प्यायला नाहीय. दारुड्याचा अभिनय करतोय.
गुरुदत्तसोबत आजूबाजूला असलेल्या सगळ्यांनाच धक्का बसला. इतका अप्रतिम अभिनय पाहून गुरुदत्त खुश झाले. आणि त्या दारुड्याचं नाव ठेव…

चपाती पलटत राहिली पाहिजे...

Image
कदाचित महिने झाले असतील. फेसबुकवरच दोन-तीन ओळींची एक पोस्ट लिहिली होती. विनोदी अंगाने होती. म्हणून पोस्टखाली दोन-तीन दात काढून हसणाऱ्या स्मायलीही टाकल्या होत्या. पण त्या विनोदात किती गंभीर गोष्टी दडल्यात, हे जाणवू लागलंय.
काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेला विनोद असा होता - "भाजपवाले एखाद्या नेत्याला पक्षात घेण्यासाठी दोन फोटो समोर ठेवत असावेत - पहिला बबनराव पाचपुतेंचा आणि दुसरा छगन भुजबळांचा. आणि एवढंच विचारत असावेत, बोला कुणासारखं व्हायचंय? बस्स. समोरचा नेता सामान-सुमान भरुन भाजपप्रवेशाच्या तयारीला लागत असावा."
विनोद म्हणून फेसबुकवर शेअर केलेली ही पोस्ट वास्तव बनत चालल्यासारखं वाटू लागलंय. गेल्या काही दिवसात तर या वास्तवाची तीव्रता आणखी तीव्र होताना दिसू लागलीय.
कर्नाटक सरकार असो, कन्हैय्या कुमार असो, किंवा परवाचा हार्दिकच्या अटक वॉरंटची घटना असो.... आमच्याविरोधात बोलाल, तर तुम्हाला कायद्याच्या कचाट्यात अडकवू आणि तुमचं जिणं हाराम करत राहू - असा एक इनडायरेक्ट मेसेज देण्याचा प्रयत्न मला ठळकपणे दिसून येते.
अर्थात, या गोष्टी काँग्रेसच्या काळात झाल्या नाहीत किंवा झाल्या नसतील, अशातला भा…

गंडलेलं 'नवनिर्माण'

Image
सोईचा मुद्दा, सोईची जागा, सोईची वेळ आणि सोईची तडजोड... राज ठाकरेंच्या आंदोलनांचा अभ्यास केल्यास असंच काहीसं चित्र दिसून येतं. कुठलं आंदोलन तडीस नेलंय असं दिसत नाही. प्रत्येक ठिकाणी अर्ध्या वाटेतून पळून जायचं. सगळं शांत होऊ द्यायचं अन् मग पुन्हा नव्या मुद्द्यासोबत रस्त्यावर उतरायचं.
खरंतर अर्धवेळ राजकारण्यांकडून वेगळं काही अपेक्षित नाहीच. मात्र 'एकहाती सत्ता द्या. सगळ्यांना सुतासारखं सरळ करेन' असं बोलणाऱ्यांकडून थोडी अपेक्षा वाढली होती. किमान शहरातल्यांची तरी. गावाकडे राज ठाकरे वगैरे काही भानगड नसते. असले मराठी-बिराठीचे मुद्दे तिथे तग धरत नाही. हे भावनेचे मुद्दे शहरातल्यांसाठी असतात. असो. तर सुतासारखं सरळ करणाऱ्यांची गाडीही मारहाणीच्या पुढे सरकताना दिसतच नाही.
टोलनाक्यांच्या मुद्द्यावर आंदोलन छेडलं. बऱ्यापैकी यशही मिळालं. पण ते आंदोलन आणखी पुढे रेटण्याची गरज होती. तसे झाले नाही. मराठी पाट्यांचं आंदोलनही तसंच. दादर, डोंबिवली, कांदिवली वगैरे नेमक्या ठिकाणी काही दुकानांच्या इंग्रजी पाट्या तोडल्या. झालं. आंदोलन हवेत विरलं. रेल्वेभरतीवेळी काही अमराठी तरुणांना बेदम मारहाण केली. तेवढ्या…