Posts

Showing posts from July, 2017

नियोगींच्या शोधात!

Image
चार पाच वर्षांपूर्वी. म्हणजे कॉलेजला असताना वगैरे. गिरिजा गुप्ते मॅडमनी शंकर गुहा नियोगींवर वाचन करायला सांगितलं होतं. गिरिजा गुप्ते म्हणजे साठ्ये कॉलेजच्या सोशोलाॅजीच्या हेड. आणखी मोठी ओळख सांगायची तर, त्या कामगार नेते कॉ. वसंत गुप्तेंच्या कन्या. तर त्यांनी नियोगींवर वाचायला सांगितले. त्यांनी जाणीवपूर्वक संदर्भ, पुस्तकांची नावं वगैरे काहीच दिली नाहीत. म्हणाल्या, तुझं तू शोध आणि वाच. त्या शोधण्याच्या प्रोसेसमध्येही खूप काही गवसेल. आयते संदर्भ दिले तर शोधण्याच्या प्रोसेसमधील ज्ञान गमावशील.

झालं.. म्हटलं आता हे नियोगी कुठे भेटतील? मग गूगलबाबाकडे गेलो. वीकिपिडियावर माहिती मिळाली. पण तीही त्रोटक. मग डोकं आणखी भणभणायला लागलं. म्हटलं काय फाल्तूगिरीय राव? गिरीजा मॅडमने नाव सांगावं एखद्या व्यक्तीचं आणि त्याच्याबद्दल इंटरेनेटलाही माहिती नसावी!

त्या काळात दादरच्या मुंबई मराठी संदर्भ ग्रंथसंग्रहालयात आठवड्याला दोन-तीनदा येणं जाणं होत असे. कॉलेज सुटल्यावर कामावर दांडी मारुन दादर गाठलं. तिथे ते दाढीवाले काका असायचे. अजूनही असतात बहुधा. ते दाढीवाले काका कधी हसतच नसत. कायम धीरगंभीर चेहरा. पुस्तकांची ख…

आय लव्ह यू सनी लिओनी!

Image
जगाची पर्वा करु नये वगैरे बाता मारुन मारुन अनेकजण थकतात. इनक्लुडिंग मी. पण प्रत्यक्षात प्रसंग येतो त्यावेळी लोक काय विचार करतील, याचाच विचार करत बसतो. मग ते ‘लोग क्या कहेंगे, ये भी हम सोचेंगे, तो लोग क्या सोचेंगे?’ असले कधीकाळी उर बडवून हाणलेले डायलॉग विसरुन जातो आणि लोकांचाच विचार करुन पाय पुढे-मागे सरकवत बसतो. अशा प्रसंगांवेळी मला सनी लिओनी खूप उजवी वाटते.
पॉर्न स्टार म्हणून प्रसिद्धीस आलेली सनी लिओनी पुढे भारतात येऊन बॉलिवूडमध्ये नशीब अजमावते आहे. मात्र, इथेही तिला अनेकदा भेदांना सामोरं जावं लागलं. तिने तशी जाहीर खंतही व्यक्त केली होती. मात्र कुठेही न खचता, तिने आपलं करिअर सुरुच ठेवलं. एकामागोमाग एक सिनेमे येत राहिले आणि देशाच्या कानाकोपऱ्यात ती पोहोचली. आता कुठे अवॉर्ड शोमध्ये वगैरे तिला प्रस्थापित बॉलिवूडकर एखाद्या कोपर्‍यात जागा देऊ लागले आहेत. हेही काही बॉलिवूडचे उपकार नाहीत. तर सनी लिओनीने स्वतःला सिद्ध केल्यानंतरचे पडसाद म्हणता येईल.
भारतात सनीला पॉर्न स्टारच्याच अँगलने पाहिले गेले. अजूनही तिचा उल्लेख ‘पॉर्न स्टार ते बॉलिवूड स्टार’ असाच होतो. ही किचकट कट्टर भारतीय मानसिकता आहे.…

बीएमसीसम्राटांचं 'सूड'कारण

Image
हिरोचा सूड घेण्यासाठी व्हिलन एखाद्या पोलिसाला पैसे देतो. मग पोलिस हिरोच्या घरी येतात. 'तुम्हारे घर में हाथियार हैं' किंवा 'तुम्हारे घर में ड्रग्ज हैं' वगैरे डायलाॅग मारुन तपास सुरु करतात. त्यापैकी व्हिलनकडून पैसे घेतलेला पोलिस पटकन हत्यार किंवा ड्रग्ज तिथे लपवतो आणि तोच शोधून काढतो. मग हिरोला अटक करतात आणि जेलमध्ये टाकतात.
आठवतंय का असं काही? हिंदी पिक्चरमध्ये तर सर्रास असे सीन असायचे. महेश मांजरेकरांच्या 'कुरुक्षेत्र'मध्येही आहे असा एक सीन. पण हल्लीच्या सिनेमांमध्ये सूड घेण्याचे हे सीन कमी असतात. म्हणूनच की काय, उद्धव ठाकरेंनी कमी भरुन काढलीय. निमित्त मलिष्का ठरली.
असंख्य मुंबईकरांच्या समस्येला तिने फक्त गाण्यातून व्यक्त केले. तर पालिकेसह मातोश्रीवर इतका जळफळाट झाला की, थेट मलिष्काच्या घरात पालिकेचे अधिकारी धडकले आणि तपासणीत अळ्या सापडल्या. आता मलिष्काच्याच घरी का तपासणी पथक गेले, त्यांना तिथे अळ्या असण्याचे स्वप्न पडले होते का, सोनूचं गाणं आणि या तपासणी छाप्याचा काही संबंध आहे का वगैरे निरर्थक प्रश्न विचारु नयेत. ते महत्त्वाचे नसतात. असो.
मुंबईतील रस्त्यांवरील ख…

मशिदीच्या आडोशातली माणुसकी

Image
मुंबईतील दहिसरला हायवेवर एक मशीद आहे. नॅन्सी काॅलनी बस स्टाॅपच्या थोडं पुढे. आता मेट्रोचं काम सुरुय म्हणून बस स्टाॅप तोडलाय.
पाच-सहा दिवसांपूर्वीची गोष्ट. हायवेच्या इकडून जात होतो. जोराचा पाऊस आला. थांबलो. आजूबाजूला पाहतोय, तर आडोसा दिसेना. मेट्रोच्या कामामुळं कन्स्ट्रक्शनचं सगळं साहित्य पडलेलंय. आडोसा म्हणून मशीदच होतं. भिजायचं नव्हतं. पण मशिदीच्या पडवीत कसं जावं, या विचाराने तिथेच गोंधळत राहिलो. पाऊस वाढला, मग न राहता मशिदीच्या पडवीत घुसलो.
दुपारची वेळ. त्यामुळे फार कुणी तिथं नव्हतं. दोघे जण होते फक्त. एक पस्तीशी-चाळीशीतला आणि दुसरा साठीतला बहुतेक. तर पडवीत अगदीच कोपर्‍याला उभा होतो. बाहेर पडणाऱ्या मुसळधार पावसाचे शिंतोडे अंगावर येत होते.
मशिदीच्या पडवीत हात-पाय धुण्यासाठी रांगेत चार-पाच नळ आहेत. तिथे हे दोघे गप्पा मारत बसले होते. एक जण नळाचं काहीतरी काम करत होता. दुसरा त्याच्याशी बोलत होता.

नुसताच गप्पा मारत बसलेल्या साठीतल्या माणसाने माझ्याकडे पाहिलं. मी आपला बाहेर पाहत होतो. पाऊस जाण्याची वाट बघत उभा होतो. माझ्यावर उडणारे पाण्याचे शिंतोडे त्या साठीतल्या माणसाने पाहिले असावे बहुत…