Posts

Showing posts from June, 2017

आकाशच्या इंटरकास्ट लग्नाची गोष्ट

Image
आता जवळपास महिना व्हायला आलाय आकाश आणि निकिताच्या लग्नाला. या दोघांच्या लग्नाचा प्रसंग थरारक आहे. लग्नाचा दिवस तर विसरुच शकत नाही. मुळात थेट लग्नाचा प्रसंग सांगण्याऐवजी एकंदरीतच बॅकग्राऊंड सांगण्याची गरज वाटते. थोडी लांबलचक वगैरे पोस्ट होईल.. पण ठीकंय. खूप दिवस लिहीन म्हणत होतो. पण राहत होतं. म्हणून लिहितोच.
कॉलेजच्या काळापासून, विशेषत: डिग्रीच्या फर्स्ट ईयरपासून एक मित्र अधिक जवळचा होता. तो म्हणजे आकाश लोणके. मी पार्ल्यातल्या विमानतळाजवळील झोपडपट्टीत राहायचो आणि आकाश तिथेच पुढे आंबेडकरनगरमध्ये. कॉलेजला येणं-जाणं सोबत. पुढे आणखी एक मित्र जोडला गेला, तो म्हणजे राजेश पाटील. आता असे एकूण तीन मित्र झालो. अगदी जिगरी.
कॉलेजमध्ये अनेक खाच-खळग्यांच्या दिवसात आकाश, राजेश आणि मी एकमेकांना मदतीचा हात देत राहिलो. अगदी कोणत्याही अपेक्षेविना. अर्थात खऱ्या मैत्रीत अपेक्षा नसतेच. अगदी तसंच. पुढे कॉलेज संपलं आणि आम्ही आपापल्या कामाच्या शोधात निघालो. मध्यंतरी आकाश 'मुंबई मित्र'ला कामाला लागला, मी एबीपी माझात. राजेशच्या जॉबचं काही झालं नाही. कारण त्याच्या घरीच असंख्य प्रॉब्लेम सुरु होते. तर एकं…

डेन्जर गांधी

Image
गांधी हा प्राणीच डेन्जर होता.  त्याला वगळून पुढे जाताच येत नाही.

गांधी मेला नाही.  गांधी मरणारही नाही. मुळात गांधी मरतच नाही.

इकडे गांधी तिकडे गांधी जिकडे तिकडे गांधीच गांधी
काँग्रेसच्या पोस्टरवर गांधी मोदींच्या भाषणात गांधी केजरीवालच्या टोपीवर गांधी अण्णांच्या उपोषणात गांधी हाॅलिवूडच्या पिक्चरात गांधी पोंक्षेच्या नाटकात गांधी वर्ध्याच्या आश्रमात गांधी आश्रमातल्या विश्रामात गांधी
इकडे गांधी तिकडे गांधी जिकडे तिकडे गांधीच गांधी.

कुणाला पक्षाच्या बॅनरवर गांधी हवा असतो. तर कुणाला स्वच्छतेचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून. कुणाला विचारांसाठी, तर कुणाला टीकेसाठी. कुणाला वैचारिक खाद्य म्हणून हवा असतो. तर पोंक्षेंसारख्यांना पोटापाण्याचा प्रश्न भागवण्यासाठी. कारण काहीही असो.  गांधी लागतोच.

किती आले किती गेले.  काहींनी जमेल तितकी जमेल तशी बदनामी केली. तर काहींनी हव्या तेवढ्या हव्या तशा शिव्या दिल्या.  काहीजण टकळ्या म्हणाले. काहीजण उघडा म्हातारा म्हणाले. काल-परवा तर कुणीतरी देशद्रोही म्हणाले.

एवढ्या टीकेनंतरही गांधी मिश्किल हसतो. या म्हाताऱ्याच्या मनात राग कधीच नसतो.

जिथे जन्मला गांधी, तिथेच हरला गांधी.  जिथे लढला गांधी, तिथे कणभर…

हे भयंकर अस्वस्थ करणारं चित्र आहे!

Image
इंग्लिश शाळांच्या पिवळ्या धमक बस सक्काळ-सक्काळ धावतात नुसत्या. इकडून तिकडे, तिकडून इकडे. कुठल्यातरी फूटपाथवर किंवा दुकानाच्या आडोशाला डोळे चोळत बसलेली चिमुरडी आपापल्या गाडीच्या रस्त्याकडे नजर रोखून असतात, गाडी लवकर येऊ नये या तीव्र इच्छेने.
जन्मठेपेची शिक्षा भोगायला जाणाऱ्या एखाद्या कैद्याच्या चेहर्‍यावरील एक्स्प्रेशन्ससारखे चिमुरड्यांचे चेहरे. कधीतरी ही सारी चिमुरडी शाळांविरोधातच उठाव करतील, असं वाटून जातं.


मग गाडी येते तेव्हा नजर रोखून बसलेले चेहरे आणखी उदास होतात. जगणंच नकोसं झालेल्या माणसासारखे भासतात. त्या पिवळ्या धमक बसमधली मदतनीस खाली उतरते आणि एखाद्या जेलरप्रमाणे चिमुरड्यांना गाडीत भरते. आणि दरवाज्यातच उभी राहते पुढच्या कैद्यांना शोधत.
दहा-पंधरा जणांच्या घोळक्यातला एखादाच चिमुकला गाडीच्या इमर्जन्सी एक्झिट विंडोतून आपल्या बेन्चमेटला पाहून हसत हसत हात दाखवतो. अगदी एखदाच. बाकी सारे शाळेचे कैदीच जणू.
हसत-खेळत शिकवण्यापेक्षा, शिकण्याची आवड निर्माण करण्यापेक्षा जबरदस्तीने उत्तरं कोंबली जातायेत डोक्यात. शाळेच्या शंभर टक्के निकालाच्या हव्यासापुढं ही चिमुरडी शिकण्यालाच कंटाळत चाललीयेत. हे…

वो भी क्या दिन थे, जब राज ठाकरे 'राजसाब' थे...

Image
आता तीनशे साठ अंशात मत बदललंय. विचार बदललेत. प्रत्येक मुद्द्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय. पण जर तीनशे साठ अंश हे चक्र उलट फिरवलं, तर मी काहीसा वेगळा सापडतो. आताचा मी आणि तेव्हाचा मी, यात चमत्कारिक बदल जाणवतो. मी मुंबईत येणं आणि राज ठाकरेंचा आक्रमक नेता म्हणून उदय होणं, हे समकालीन वगैरे. 2008 ला मुंबईत आलो त्यावेळी कल्याणमध्ये उत्तर भारतीय परीक्षार्थींना मारहाण करत राज ठाकरे नावाचा नेता मराठी माणसांचा नवा हिरो बनत होता. पुढे मराठीच्या नावाने मारझोड करत 'मराठी ह्रदयसम्राट' ही बिरुदावलीही त्यांनी पदरी पाडली. तो काळ खऱ्या अर्थाने राज ठाकरेंचा होता. या ब्लॉगमधील माझा हा फोटो तेव्हाचाच. राज ठाकरेंच्या स्टाईलमध्ये वगैरे काढलेला. वाईट्ट फॅन होतो त्यांचा. कॉलेजच्या या काळातल्या आठवणीही तितक्याच भन्नाट आहेत.


अकरावीला पार्ल्यातल्या डहाणूकर कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतल्यानंतर अगदी काही दिवसातच राज ठाकरे नावाचं वादळ आजूबाजूला घिरट्या घालू लागलं. गावाकडनं आल्याने आधीच थोडा न्यूनगंड मनात होता. त्यामुळे समविचारी आणि सेम परिस्थितीतला कुणी मित्र हवाच होता. तेव्हा अशुतोष चव्हाण भेटला. अशुतोष डा…

शेतकरी संपावर दृष्टीक्षेप

Image
लिहावं की नाही आणि लिहावं तर नक्की काय लिहावं, अशा बारीक-सारीक प्रश्नांशी येऊन गेले पाच दिवस थांबतोय. काही मुद्द्यांवर दुमत आहे, तर काही मुद्द्यांवर रोखठोक भूमिका आहे. आणि काही मुद्द्यांना कडाडून विरोधही आहे.
काल-परवा जेव्हा लिहिण्याचा विचार केला, तेव्हाच ठरवलं, सरसकट कोणतीच भूमिका न घेता, त्यावर मुद्देसूद लिहायचं. भले शेतकरी संपाविरोधात गेलं तरी चालेल किंवा सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने एकांगी वगैरे वाटलं तरी चालेल.
खरंतर खूप मुद्दे आहेत. खूप अंग आहेत. तेवढीच मतं-मतांतरंही आहेत. पण आज अमर हबीब सरांची मुलाखत ऐकली आणि काही मुद्दे क्लियर झाले. त्यानंतर म्हटलं यावर थोडं लिहूया. मग येणाऱ्या प्रतिक्रियेवरुन आपण आपल्या मतात तसे बदल करु, जर समोरच्याचं योग्य असेल तर.
आताही लिहितोय, ते बहुधा विस्कळीत असेल. अधे-मधे लिंक तुटेल. पण बघा. शक्य असल्यास पूर्णच वाचा.
मागण्या काय? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी, या चार प्रमुख मागण्या पुढे करत शेतकऱ्यांनी संपाचं हत्यार उचललं. खरंतर या चा…