Posts

Showing posts from January, 2017

'सिंह' सध्या काय करतो?

Image
साधारणत: कोणताही नेता राजकारणातून बाहेर जाताना तसं सांगतो किंवा निवडणुका लढण्याचे टाळत त्यातून बाहेर पडत जातो. पण कालपर्यंत आपल्या आक्रमक टीकेने विरोधकांना घायाळ करणारा कुणी नेता जेव्हा अचानक बोलणं बंद करतो आणि हळूहळू मागे सरतो अन् एका बेसावध क्षणी सक्रीय राजकारणातूनच बाहेर पडतो, हे सारं थोडं विचित्र आणि आश्चर्यकारक वाटतं. या फोटोतील माणसाचं असंच काहीसं आहे.
शिरीष पारकर. मनसेचे सरचिटणीस आणि राज ठाकरेंचा कट्टर कार्यकर्ता, ही त्यांची शेवटची ओळख. शेवटची यासाठी म्हटलं कारण गेली चार-एक वर्षे हा नेता कुठेच दिसत नाही. सक्रीय राजकारणातून बाहेर पडल्यानंर कुठल्या कार्यक्रमातही दिसले नाहीत.
शिरीष पारकरांची मला आताच इतकी तीव्र वगैरे आठवण का यावी? असा प्रश्न पडला असेल. तर असंय की, विलेपार्ल्यातले काँग्रेसचे कृष्णा हेगडे भाजपात गेले. मी पार्ल्यात काही वर्षे वास्तव्य केल्याने काही आठवणी जाग्या झाल्या आणि पारकरांची आठवण आली.
शिरीष पारकर. मनसेचे आक्रमक शिलेदार. मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून मुंबईत मनसे ज्यांनी वाढवली, त्या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे शिरीष पारकर.
मला आठवतंय…

आठवणीतला प्रवास अन् प्रवासातल्या आठवणी

Image
रुळलेल्या वाटेवरुन न जाता वेगळी वाट चोखाळत पत्रकारिता हे क्षेत्र निवडलं. पंचक्रोशीत आतापर्यंत या क्षेत्रात येण्याचं कुणी धाडस केलं नव्हतं. याला दोन कारण होती. एक म्हणजे- या क्षेत्रात कसं यायचं, पत्राकारितेत येण्यासाठी शिक्षण काय घ्यावं लागतं, याबद्दल मार्गदर्शन करणारं कुणीच नसायचं आणि दुसरं म्हणजे- कुणी मार्गदर्शन केलं तरी नोकरी मिळेल का, नोकरी मिळाली तर नोकरीची हमी आहे का वगैरे प्रश्न आ वासून उभे असायचे. त्यामुळे 'ये अपने बस की बात नहीं' म्हणत सगळेच या क्षेत्रापासून लांब राहायचे.
मला या क्षेत्राची माहिती होती, अशातला भाग नाही. पण ज्यावेळी विलेपार्लेतील म. ल. डहाणूकर काॅलेजसारख्या नामांकित कॉलेजमध्ये कॉमर्स शिकत होतो. त्यावेळी तिथे नाट्य मंडळात काम करत असताना वेगळं क्षेत्र निवडायचं ठरवलं आणि डहाणूकर कॉलेजच्याच समोर असलेल्या साठ्ये कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ मास मीडियाला अॅडमिशन घेतलं. फायनान्शियल बॅकग्राऊंड पाहता खरंतर मोठी रिस्क होती. पण मुंबईत आलोय तर काहीतरी वेगळं करायचंच, हे ठरवलेलं. डॉ. नरेंद्र जाधवांच्या वडिलांनी नाही का त्यांना सांगितलेलं, 'ज्यात जाणार त्यात टॉपला जायचं'…

तुटलेल्या फांदीला तुटलेल्या मनाने श्रद्धांजली!

Image
आर्ची बसलेली फांदी तुटली.
फार म्हणजे फार म्हणजे फारच दु:ख झालं.
मनाला तीव्र चटका लागला.
पण मी समजावलं मनाला.
म्हटलं, आता झालं ते झालं.
नियतीच्या मनातलं आपण कसं ओळखणार?
त्या फांदीच्या नशिबातच ते होतं.
तेव्हा कुठे आसवांनी पॉज घेतला.
पण डोळ्यांच्या कडा पाणवलेल्याच आहेत.
असो.
मला माहितंय, तुमच्यावरही दु:खाचं डोंगर कोसळलंय.
अर्थात त्या फांदीशी नातंही तसं होतं आपलं.
पण आता दु:ख गिळून थोडं सावरुया.
एकमेकांना आधार देऊया.
पुन्हा नव्या दमाने उभं राहूया.
मात्र दु:खातनं सावरलो तरी हलगर्जीपणा नको.
आर्ची-परशा बसलेल्या घोड्याला चारा-पाणी मिळतोय ना?
हैदराबादच्या त्या झोपडपट्टीत चोवीस तास वीज-पाणी मिळतंय ना?
आर्चीच्या ऊसशेतीचं अतिवृष्टीनं नुकसान झालं नाही ना?
बिटरगावचे क्रिकेट सामने सालाबादप्रमाणे सुरुयेत ना?
आर्चीच्या बुलेटमध्ये पेट्रोल आहे ना?
'थेट शेतात' जाणा-या रस्त्याचे डांबरीकरण झालंय ना?
आणि ती विहीर... त्यात पाणी आहे ना?
असे हाय-लेव्हल-सेन्सिटिव्ह विषय आ वासून आपल्यासमोर उभे आहेत. त्यामुळे अत्यंत हळव्या मनाच्या जनतेला माझं हेच आवाहन आहे की, आता फांदी तुटल्याच्या दु:खातून सावरायला हवं आणि या विषयांकडे लक्ष द…

राज ठाकरे कुणाशी युती करणार?

Image
मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आलीय. फेब्रुवारीत निवडणुका होणार आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे मिनी-विधानसभा. एखाद्या छोट्या राज्याएवढा अर्थसंकल्प असणारी महापालिका आहे. त्यामुळे अर्थात सर्वच पक्ष जीवाचं रान करतात. त्यात गेली कित्येक वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणूक म्हणजेच सत्ता राखण्याची अन् प्रतिष्ठेची लढाई आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत फार ताकद नसलेल्या भाजपने गेल्या दोन वर्षात प्रचंड मुसंडी मारलीय. सगळीकडेच मोठं यश मिळत असल्याने भाजपने शिवसेनेला टक्कर देण्याची आशा बाळगलीय.
दुसरीकडे मनसे आहेच. गेल्यावेळी मुंबई महापालिकेत 28 नगरसेवकांना निवडून आणणाऱ्या मनसेची यंदा किती नगरसेवक येतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण आधीच्या 28 पैकी जवळपास निम्म्या नगरसेवकांनी पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश केला आहे. तर तिकडे काँग्रेस-राष्ट्रवादी मुंबई महापालिका स्वबळावर लढत असल्याने त्यातल्या कुणाचीही एकहाती वगैरे सत्ता येणं दुरापस्त गोष्ट. त्यामुळे युती झाली नाही, तर शिवसेना आणि भाजपमध्ये खरी लढत असेल. मात्र, इथे थोडा इंटरेस्टिंग टर्न मिळालाय तो राज ठाकरेंच्या विधानाने.
मनसे …

धावरकुट्या

Image
तथाकथित प्रमाण वगैरे भाषेत लोहार. पण आमच्या गावाकडं धावरकुट्या. शेतीच्या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा अंग. कोयता-विळी पाजवण्यासाठी धावरकुट्याला पर्याय नाही. नितीन मोकल यांच्या पोस्टसोबत गणेश बागल यांनी टिपलेला हा फोटो पाहिला आणि धावरकुट्याची जिंदगी डोळ्यासमोरुन सरकू लागली.
सप्टेंबर महिना उजाडला की पाऊस परतीच्या मार्गाला निघतो. महिना संपेस्तोव निघून जातो अन् लागोलग थंडी येते. हिकडं भाताच्या काड्या हातभर वर आलेल्या असतात. पंधरा-वीस दिसात कोंबड्या पिल्लाचा निवद दाखवून कापणीला सुरुवात केली, तरी चालतंय. असे हे दिवस.
कापणी जवळ आली, मग कोयत्या, विळ्या, कुऱ्हाडी पाजवून घ्यायला पायजे. मग ढोरांशी जाणा-यांची रानावनात, पाणी भरणाऱ्या बायकांची विहिरीवर अन् म्हातारी-कोतारी भर दुपारी कुणाच्यातरी पडवीत बसून तांदूळ निवडताना....सगळीकडे एकच चिंता- ह्यो औंदा धावरकुट्या आला नाय तो. मेला राह्यला कुठं? भाता कापायला झालीत. आता धावरकुट्याला बोलावणं धाडण्याची यळ आली की काय म्हणायची कुणब्यावर?
चर्चांचं फड ठिकठिकाणी सुरु असताना कधीतरी दुपार टळून सूर्य मावळतीला निघताना एक बैलगाडी गावात शिरते. दोन पांढरे शुभ्र बैल, …

राहुल गांधी, वैयक्तिक टीका, संस्कार वगैरे

Image
आजी आणि बापाची हत्या झाली. दोन्ही हत्येची कारणं वैयक्तिक नव्हती, तर या देशाशी संबंधित होती. आजी आणि बापाची हत्या झाल्यानंतर अर्थातच सुरक्षेचं कवच अधिक कडक केलं जाणार होतं. तसं झालंही. कधी नाव बदलून शिक्षण, तर कधी नाव बदलून नोकरी. स्वत:ची खरी ओळख सांगणं सुद्धा जीवाला धोका होता. स्वत:ची ओळख न सांगता जगणं, हे किती भयानक आहे! इमॅजिन करवत नाही.
राहुल गांधी असेच जगले. लोकांमध्ये बिनदिक्कीतपणे मिसळता येत नव्हतं किंवा कुठेही ख-या ओळखीने जाता येत नव्हतं. बरं या सर्व गोष्टी तुमच्या-आमच्यामुळेच. कारण त्यांच्या जीवाला भीती असण्याची कारणं वैयक्तिक नव्हती, तर या देशाशी संबंधित होती. कदाचित लहानपणापासून सर्वसाधारण मुलांसारखं मुक्तपणे बागडायला मिळालं नाही म्हणून किंवा अत्यंत संवेदनशील स्थितीत जीवन जगल्याने असेल, राहुलना तळागाळात पोहोचता आलं नाही. म्हणून अनेकदा भाषणात-वागण्यात कृत्रिमपणा जाणवतो. पण त्यामागील भावना खरी वाटते. हे राहुल गांधी या व्यक्तीबद्दल बोलतोय. काँग्रेस पक्षाबद्दल नाही.
जीवाला असलेला धोका आजही कमी झालेला नाही. आजही 'आपरेशन ब्ल्यू स्टार'ची भीती कमी झालेली नाही. अशा एकंदरीत भया…