Posts

Showing posts from November, 2016

कुबेर सरांचा फिडेलद्वेषी संपादकीय लेख आणि काही प्रश्न

Image
लोकसत्तेचा आजचा संपादकीय (क्रांती, कॅस्ट्रोआणि जग) लेखात काही मुद्दे आक्षेपार्ह, दिशाभूल करणारे आणि असत्य वाटले. अमेरिकेतील एखाद्या पत्रकाराने फिडेल कॅस्ट्रोवर लिहिल्यासारखा आजचा संपादकीय वाटतो. कारण वाक्यागणिक फिडेलद्वेष स्पष्टपणे दिसून येतो. फिडेलवरील रागापायी कुबेर सरांनी अत्यंत ऐकीव माहितीच्या आधारावर फिडेलवर टोकाचे आरोप केले आहेत. हे आरोप सर्वसामान्य वाचकांची दिशाभूल करणारे आहेत. या सर्वांवर चर्चा करण्याबरोबर संपूर्ण संपदकीय लेखाचीच चर्चा करुया.
नेहमीप्रमाणे सहा कॉलमचा संपादकीय. यातील पहिला दीड कॉलम हुकुमशहाची लक्षणं आणि वर्णन करण्यात घालवला आहे. या दीड कॉलममधील काही मुद्द्यांशी सहमत आहे. म्हणजे एखाद्या हुकूमशहानं खोट्या कहाण्या सांगणं किंवा एखाद्या हुकुमशहाचं वैयक्तिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य विरोधी असतं वगैरे. किंवा अगदी नेतृत्त्वमंडलात दुसऱ्या क्रमांकावर कोणीही चालत नाही वगैरे. हे सर्व ठीकंय. हुकुमशहा कसा असतो, हे चांगल्याप्रकारे कुबेर सरांनी सांगितलंय. पण पुढे या मुद्द्यांचा फिडेल कॅस्ट्रोशी संबंध जोडल्याने, कुबेरसरांचा फिडेलद्वेष स्पष्टपणे दिसू लागतो. अगदी प्रत्येक वाक्या-…

"घेऊन जा तिला. आता तुझं कर्ज फिटलं."

...ते दोन पाय मातीने माखलेले होते. चिखलात बरबटलेले. चकचकीत पांढ-या शुभ्र मार्बलवर एखाद्या नव्या नवरीचे कुंकवाने रंगवलेल्या पायाचे ठसे उमटावे तसे त्या दोन पायांचे ठसे उमटले. आखीव आणि रेखीव. घराच्या मधोमध शेवटच्या ठशांवर ते माखलेले पाय स्तब्ध होत उभे राहिले.
पायांच्या नखांमध्ये माती भरलेली. बरबटलेले पाय लपवायचे तरी कसे? तरीही जमतील तितकं पायांची बोटं दुमडण्याचा प्रयत्न करी, पण तोल जाई. मग पुन्हा सावरुन उभं राहावं लागे. पायांनाही घाम सुटला. त्याची भीती अन् अविश्वास दाखवणारी पायांची अलगद हालचाल स्पष्ट दिसत होती.
इतक्यात समोरुन आणखी दोन पाय आले. जाडजूड, ठाम आणि निर्धास्त. आडदंड अन् रुबाबदार पैलवानी अंगाचा अंदाज यावा असे ते पाय.
नंतर आलेल्या पायाचा माणूस खुर्चीत बसला आणि एक पाय दुस-या पायावर आखडून टाकला. तोच इकडे माखलेल्या पायाचा माणूस त्याच अविश्वासू अवस्थेतील पायाने उभा होता. त्याच्या पायांना आणखी घाम सुटला.
आता चार पायांची दोन माणसं त्या पांढ-या शुभ्र मार्बलच्या खोलीत झाली होती. तोच आणखी दोन पाय त्या खोलीला चिटकून असलेल्या खोलीतून बाहेर आले. याच खोलीतून तो आडदंड अन् रुबाबदार माणूसही बाहेर आल…

लेनिन, यशवंतराव चव्हाण आणि जॉन रीड्सचं पुस्तक

Image
टेन डेज दॅट शूक द वर्ल्ड..... रशियन राज्यक्रांतीचा अभ्यास करणारे हे पुस्तक वाचल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकत नाहीत. इतकं काय महत्त्वाचं होतं या पुस्तकात? की दस्तुरखुद्द लेनिनने हे पुस्तक वाचण्याचं जनतेला आवाहन करावं. रशियासारख्या बलाढ्य देशाचा नेता आणि रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता एखादं पुस्तक वाचायला सांगतो, हे नक्कीच वेगळं आहे. म्हणून या पुस्तकाबद्दल थोडं लिहिण्याचा विचार मनात डोकावला आणि जी माहिती मिळाली, त्याआधारे थोडं लिहिलंय... जॉन रीड्स या अमेरिकन पत्रकाराने 1919 साली ‘टेन डेज दॅट शूक द वर्ल्ड’ हे पुस्तक लिहिलं. रशियन राज्यक्रांतीचं आँखो देखी रिपोर्टिंग म्हणजे हे पुस्तक. स्वत: अनुभवलेले प्रसंग, भेटलेले नेते आणि स्वत:च्या नजरेतून विश्लेषण असं या पुस्तकाचं स्वरुप. फर्स्ट हँड एक्सपीरियन्स्ड असं या पुस्तकाला म्हणता येईल. “THIS book is a slice of intensified history—history as I saw”, या वाक्याने जॉन रीड्सने ‘टेन डेज दॅट शूक द वर्ल्ड’ या आपल्या पुस्तकाची सुरुवात केलीय. जॉन रीड्स हा मूळचा अमेरिकन पत्रकार. ‘द मासेस’ या मासिकासाठी रशियन राज्यक्रांती कव्हर म्हणून करायला गेला आणि तो तिथला…

हेमिंग्वेचं फॉकनरला सणसणीत उत्तर

Image
काही लेखक उगाच किचकट वगैरे लिहितात, असं एक वाचक म्हणून माझं मत आहे. असं किचकट लेखन वाचल्याने वाचक पार गोंधळू जातात. अनेकदा तरअसे होते की, लेखक वाचकाला गृहित धरतो. अॅक्चुअली तसं न करता, आपलं लेखन सर्वसमावेशक असायला हवं. 'बिटविन द लाईन्सच्या फंदात न पडता, जसं आहे तसं लिहावं. कारण या तथाकथित 'बिटविन द लाईन्स' सगळ्यांनाच कळतात, अशातला भाग नाही.
अगदी मराठीतलं उदाहरण घेऊन बोलायचं झाल्यास, अनिल अवचट किंवा आसाराम लोमटे वगैरे लेखकांसारखं लिहावं. जे ओठात, तेच शब्दात. फार वेडीवाकडी वळणं नाहीत किंवा उगाच नको असलेल्या तांत्रिक शब्दांची गुंफण नाही. साधं-सोपं लेखन. वाचकांनाही ते आवडतं. तर दुसरीकडे विलास सारंग. तसं मी नेहमीच सांगतो की, विलास सारंग माझे वन ऑफ दी फेव्हरेट लेखक. सारंगांचं बहुतेक लेखन वाचलंय. मॅनहोलमधला माणूस असो किंवा त्यांच्या कविता वगैरे. सर्वच. पण मला सारंगांचं लेखन प्रचंड किचकट वाटतं. त्यांचं लेखन समजणारा एक वेगळा वाचकवर्ग असावा, असं सारखं वाटतं.
याचा परिणाम असा होतो की, एखादं किचकट पुस्तक एखाद्या नव्यानेच पुस्तकं वाचायला सुरुवात केलेल्या वाचकाच्या हाती पडलं, तर वाचनापासून…