Posts

Showing posts from October, 2016

कोबाड गांधी सुटले!

Image
'डून' या डेहारादूनमधील प्रसिद्ध शाळेत शिक्षण. संजय गांधी वर्गमित्र. त्यानंतर मुंबईतील सेंट झेवियर्समधून शिक्षण. वरळी सीफेसला अलिशान अपार्टमेंट. लंडनमधून चार्टर्ड अकाऊटन्सीचं शिक्षण...... ते आदिवासी पाड्यात काम करणारा कार्यकर्ता. कसा आहे या माणसाचा प्रवास. कोण आहे हा कोबाड गांधी?.......
साधरणत: अत्यंत गरिबीची, हालाखीची परिस्थिती, त्यातही सरकारच्या कुठल्याही योजना न पोहोचल्याने सरकारविरोधात असलेल्या रागातून किंवा अभ्यास कमी असल्याने ब्रेन-वॉशिंगमधून अनेकजण नक्षलवादाकडे झुकतात, असे अनेक संशोधनपर वृत्तांमधून किंवा संबंधित घटनांच्या विश्लेषणातून लक्षात येतं. खरंतर नक्षलवादी होणाऱ्यांची कारणं अनेक असतील, पण गरिबी आणि अशिक्षितपणा, हे त्यातले महत्त्वाचे. पण एखादा अमाप पैसे असलेला आणि उच्चविद्याविभूषित कुणी नक्षलवादी चळवळीला सहानुभूती देणारा असेल तर…. थोडं स्वीकारायला कठीण जाईल. पण कोबाड गांधी हा त्यातलाच माणूस.
भारतात बंदी असलेल्या माओवादी संघटनेचा सदस्य असल्याच्या आरोपावरुन आणि बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कोबाड गांधी यांना अटक करण्यात आली. मात्र, पंजाबमधील पटियाला कोर्टाने त…

अमेरिकेतल्या पुस्तक दुकानांची सैर घडवणारे दोन लेख

पुस्तकप्रेमी आणि वाचक म्हणून जगभरात पुस्तक विक्रीची काय स्थिती आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता कायमच राहिली आहे. मग गूगल सर्च करुन याबद्दल नेहमीच माहिती मिळवतो. हे सांगण्याचं कारण म्हणजे आज यासंबंधी ‘लोकसत्ता’मध्ये गिरीश कुबेर सरांनी ’१८ मैलांची ग्रंथयात्रा’ मथळ्याचा लेख लिहिलाय. यात त्यांनी न्यूयॉर्कमधील ‘स्ट्रँड बुक स्टोअर’च्या यशस्वी वाटचालीबद्दल सांगितलंय.
८९ वर्षांपूर्वी म्हणजे १९२७ साली सुरु झालेल्या स्ट्रँड बुक स्टोअरमध्ये आजच्या घडीला सुमारे २५ लाख 'प्रिंटेड' पुस्तकं आहेत. तीन मजली इमारतींचा त्यांचा संसार आहे. इथे ‘प्रिंटेड’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरलाय. कारण किंडल किंवा इतर ईबुक रिडर डिव्हाईसमुळे प्रिंटेड पुस्तकं वाचण्याकडे कळ कमी दिसतो, अशी ओरड आहे. मात्र, हे पूर्णपणे सत्य नाही, हे कुबेर सरांच्या या लेखातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं. लेख एकंदरीत भारीय. वाचनीय. सहज आणि सोप्या भाषेत लिहिलेला.
याच निमित्ताने आणखी एका लेखाचा इथे उल्लेख करणं मला महत्त्वाचं वाटतं, तो म्हणजे निळू दामलेंच्या ब्लॉगचा. साधारणत: मी आंतरराष्ट्रीय घडामोडींचं विश्लेषण वाचण्यासाठी निळू दामलेंचा ब्लॉग …

“काय बकाल वस्तीत राहतोस रे तू!”

Image
पुस्तकं वाचत असताना काही वेळा काही लेखच्या लेख किंवा संपूर्ण कथाच आपल्या आयुष्याशी रिलेट करणारी वाटते. त्यावेळी ते पुस्तक वाचण्यातही वेगळी मजा निर्माण होते. आपण आपल्याबद्दलच काहीतरी वाचत आहोत, असं वाटू लागतं. माझ्या बाबतीत असं अनेकदा झालंय. म्हणजे पुस्तकच्या पुस्तक नव्हे, पण एखादी कथा, एखादा लेख वगैरे माझ्याशीच रिलेटेड वाटू लागतं. वाचताना मग आणखी मजा येते. आज वीक ऑफ असल्याने मनोहर सोनवणेंचं 'सदरा बदललेली माणसं'वाचायला घेतलंय. वसंत आबाजी डहाकेंची दीर्घ प्रस्तावना वाचल्यानंतर 'हुश्श्श' करत पुस्तकातील लेखांकडे वळलो. जागतिकीकरणाच्या रेट्यात आपलं भोवताळ कसं बदलत गेलंय, याबाबत काही वैयक्तिक किस्से, मात्र ते आपलेसे वाटावे, असे किस्से या पुस्तकात आहेत. एकूण दहा लेखांचा हा संग्रह. पैकी सध्या पहिल्याच लेखात अजून मी आहे. 'स्केवअर फुटातली माणसं' हा पहिला लेख वाचतोय. पुण्यातील सोमवार पेठेतील लहानश्या खोलीतलं राहणीमन पुढे कसं बदलत गेलं, हे सोनवणेंनी यात मांडलंय. या लेखाच्या पहिल्याच पानावरील लेख मला रिलेट करणारा वाटला. तो असा :
मनोहर सोनवणेंनी आपल्या पुस्तकाच्या पहिल्याच लेखाच…