गांधी, उदयनराजे आणि अॅट्राॅसिटीमहात्मा गांधी आणि उदयनराजेंमध्ये लय इंटरेस्टिंग साम्य आहे. कुणी विचारही केला नसेल. पण तुम्हाला तर माहितंचय मी किती हुशार आहे. त्याच हुशारीचा वापर करुन गांधी आणि उदयनराजेंमधलं 'साम्य' शोधलंय. चला... फार दुनिया घुमाके न आणता सांगूनच टाकतो.


गांधी कुठेतरी कधीतरी बोलले होते की, माझी दोन विधानं परस्परविरोधी असतील, तर दुसरं विधान ग्राह्य धरा. कारण दोन विधानांदरम्यान माझ्यात मतपरिवर्तन झालं असणार.


उदयनराजेही याच पाँईंटवर गांधींसारखे आहेत. आता उदयनराजे असे कुठे म्हणाले नाहीत. पण त्यांचा इतिहास हेच सांगतो की, त्यांच्या दोन विधानांपैकी दुसरं विधान ग्राह्य धरावं. कारण उदयनराजेंनी पहिलं विधान 'चढल्यावर' केलं असण्याची शक्यता अधिक असते. 'उतरल्यावर' कळतं की, आपण बोलण्यातून मोठा घोळ घातलाय. मग दुरुस्ती करुन दुसरं विधान करतात.


आता तुम्हाला माहितंचंय की मी उदाहरणाशिवाय बोलत नाय. घ्या उदाहरण- बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रभूषण देण्यासाठी पत्रकारांसमोर पाठिंबा दर्शवला. पण नंतर बहुधा 'उतरली' असावी. तेव्हा मग पत्रक काढून 'बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवरायांचा इतिहास वास्तवाला धरुन नाही' असे जाहीर केलं आणि महाराष्ट्रभूषण देण्यास कडाडून विरोध केला.


सो उदयनराजेंना इतकं सिरियसली घेण्याची गरज नाही. टेक इट इजी.


आता राहता राहिला मुद्दा अॅट्राॅसिटीचा किंवा गैरवापर होत असल्याचं बोलण्याचा. तर गैरवापर होतोय, असंही बोलायचं नाही ही हुकुमशाही आहे. रद्द करावा की नाही, हा आकडेवारी व गैरवापरांच्या संख्येवर आधारित मुद्दा आहे. पण गैरवापर होतोय, असंही बोलू नये, हे जरा अतिच होतंय.


कुणी निरपराध मराठा तरुण केवळ अॅट्राॅसिटीमुळे पोलीस ठाण्याचे आणि कोर्टाचे उंबरठे झिजवत असेल, तर त्या कायद्याविरोधात त्याच्या मनात राग निर्माण होणं सहाजिक आहे आणि हा राग व्यक्तच करायचा नाही, असे म्हणणे म्हणजे मुस्कटदाबी आहे.


बाकी अॅट्राॅसिटीचा किती गैरवापर होतोय, याची आकडेवारी अजून माझ्याकडे तरी नाही. माझं गाव कुणबी आणि मराठ्यांचं आहे. मात्र, अजूनही कुणाला अॅट्राॅसिटीचा गैरवापर झाल्याचा अनुभव नाही. तरीही अॅट्राॅसिटीवर सखोल चर्चा व्हावी, या मताचा मी आहे.

No comments

Powered by Blogger.