Posts

Showing posts from September, 2016

आधार देणारा माणूस : दिपक करंजीकर

Image
नुकताच मुंबईत आलो होतो. डहाणूकरमध्ये अकरावीसाठी प्रवेश घेतला. कमवून शिकावं लागणार, हे घरातून न सांगताच कळलं होतं. कारण शिकवण्याची घरच्यांची परिस्थिती नव्हती. अशात मुंबईला आल्यावर सर्वात पहिलं काम केलं ते पेपरलाईन टाकण्याचं. त्यावेळी पार्ल्यातील संत जनाबाई रोडवरील इमारतींमध्ये पेपर टाकत असे. शिवाय याच रस्त्यावरील पार्ले निमेश सोसायटीसमोरील जी. के. जाधव नावाच्या भल्या गृहस्थाच्या पेपर स्टॉलवर पेपर विकण्यासाठी दुपारी 11 पर्यंत बसत असे. त्यावेळी पेपर वाचण्याची सवय लागली. डहाणूकरमध्ये नाट्यमंडळात सक्रीय असल्याने लोकसत्ता-मटामधील नाटकांच्या जाहिराती पाहून नवं नाटक आल्यावर ते आवर्जून पाहणं, हे ठरलेलं असायचं.
काही दिवसांनी एक व्यक्ती पेपर स्टॉलवर इंडियन एक्स्प्रेस घेण्यासाठी आली. या व्यक्तीला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटलं. नंतर ते दिपक करंजीकर असल्याचं लक्षात आलं. ‘गांधी विरुद्ध सावरकर’, ‘प्रेमाच्या गावा जावे’ या आपण पाहिलेल्या नाटकातील कलाकार. दिपक सर पेपर घ्यायला आले की, त्यांच्यासोबत नेहमी बोलणं व्हायचं. मी शिकतोय, मला वाचनाची आवड आहे, मला नाटकांची आवड आहे हे सर्व त्यांना कळल्यावर ते माझ्याशी…

एक्झिट

Image
रात्री दोन वाजता 'अफवा खरी ठरावी म्हणून...'ची पहिली कथा संपवली. एक्झिट. कथा एकच. पण दोन भागात- 'एक्झिट १' आणि 'एक्झिट २'. पहिला भाग वाचत असताना हिच कथा आहे, असं वाटून जातं. पण दुसरा भाग काहीतरी नवीनच समोर ठेवतो. पार धक्काच देतो. जोराचा.

एक्झिट कथा दोन स्त्रियांच्या मनातलं वादळ मांडते. मीता आणि प्रज्ञा- एक कथेची पात्र, तर दुसरी कथा लेखिका. एक्झिट एक कथा असली, तरी दोन जगणं आपल्यासमोर ठेवते.

कथा काल्पनिक नसतात, या मताचा मी आहे. त्या अनुभवाधारित किंवा प्रसंगाधारित असतात. (केवळ मनेरंजनासाठी लिहिलेल्या कथांबाबत बोलत नाही. कारण त्या पूर्णपणे काल्पनिकच असतात.) अर्थात कथेच्या गरजेनुसार थोडी खेचाखेच आणि काही रंजित घटना त्यात समाविष्ट केल्या जातात. पण सरसकट नाही. आणि काही कथा तर आपल्या आजूबाजूला घडलेली एखादी घटनाच वाटावी इतकी वास्तवदर्शी असते. 'एक्झिट'ला वास्ताचा मोठा स्पर्श मला जाणवला. ती कुठल्या घटनेवर आधारित आहे की पूर्णपणे कल्पनेतून साकारलीय, हे कथालेखिकाच सांगू शकेल. म्हणजे प्रज्ञा दया पवार याच.

पहिल्या भागात मीता नामक स्त्रीची कथा आणि व्यथा मांडलीय. सिद्धहस्त द…

ऑगस्टची खरेदी

Image
ऑगस्टच्या पगाराची खरेदी उशिरा झाली. इतकी की, पाच-सहा तारखेपर्यंत होणारी खरेदी, आज १४ तारीख उजाडली. म्हणजे पंधरवडा उलटलाच. हे ठीक नाही. पाच-सहा तारखेपर्यंत नवी पुस्तकं घरात आलीच पाहिजेत. अन्यथा पुस्तकांचं कपाट सैरभैर होतं. बाकी काही नाही.

माझ्या पुस्तकांचं कपाट म्हणजे अतृप्त आत्माच. पुस्तकांची भूक शमता शमत नाही. महिन्याच्या सुरुवातीला नवी पुस्तकं हवीच. अन्यथा मला त्रास देतो. हे कपाट माझ्यावर आर्थिक मंदी लादणार, हे नक्की. असो.

तर पहिल्या आठवड्याऐवजी आज पंधरवाडा उलटता-उलटता वझिरा नाका गाठला. शब्द बुक गॅलरीत गेलो. आज पूर्ण बुक हाऊस फिरलो नाही. पहिल्याच स्टँडमधील आठ पुस्तकं निवडली. अर्थात प्रत्येक पुस्तक वाचावं असंच आहे.

खरंतर पुस्तक निवडण्यामागे एक कारण असतं. तसंच आजच्या खरेदीतील पुस्तकांनाही आहे. आज जी पुस्तकं घेतलीयेत, त्यात ग्रामीण वास्तव मांडणारीच निम्मी आहेत. उदाहरणार्थ- कृष्णात खोतांच्या 'गावठाण' आणि 'धूळमाती' या दोन कादंब-या, शिवाय आसाराम लोमटेंचे 'इडा पीडा टळो' आणि 'आलोक' हे दोन कथासंग्रह.

पण फक्त ग्रामीणच नाही. असंही एक पुस्तक खरेदी केलंय, जे खरंतर आधी…

गांधी, उदयनराजे आणि अॅट्राॅसिटी

Image
महात्मा गांधी आणि उदयनराजेंमध्ये लय इंटरेस्टिंग साम्य आहे. कुणी विचारही केला नसेल. पण तुम्हाला तर माहितंचय मी किती हुशार आहे. त्याच हुशारीचा वापर करुन गांधी आणि उदयनराजेंमधलं 'साम्य' शोधलंय. चला... फार दुनिया घुमाके न आणता सांगूनच टाकतो.

गांधी कुठेतरी कधीतरी बोलले होते की, माझी दोन विधानं परस्परविरोधी असतील, तर दुसरं विधान ग्राह्य धरा. कारण दोन विधानांदरम्यान माझ्यात मतपरिवर्तन झालं असणार.

उदयनराजेही याच पाँईंटवर गांधींसारखे आहेत. आता उदयनराजे असे कुठे म्हणाले नाहीत. पण त्यांचा इतिहास हेच सांगतो की, त्यांच्या दोन विधानांपैकी दुसरं विधान ग्राह्य धरावं. कारण उदयनराजेंनी पहिलं विधान 'चढल्यावर' केलं असण्याची शक्यता अधिक असते. 'उतरल्यावर' कळतं की, आपण बोलण्यातून मोठा घोळ घातलाय. मग दुरुस्ती करुन दुसरं विधान करतात.

आता तुम्हाला माहितंचंय की मी उदाहरणाशिवाय बोलत नाय. घ्या उदाहरण- बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रभूषण देण्यासाठी पत्रकारांसमोर पाठिंबा दर्शवला. पण नंतर बहुधा 'उतरली' असावी. तेव्हा मग पत्रक काढून 'बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवरायांचा इतिहास वास्तवाला …