Posts

Showing posts from August, 2016

एकाकी आणि लोकाकी काॅम्रेड

Image
सचिन माळीचा 'एकाकी आणि लोकाकी प्रज्ञासूर्य काॅ. शरद पाटील' हे पुस्तक वाचलं. सुरुवातील प्रचंड कंटाळवाणं वाटतं. याचं कारण पुस्तक शरद पाटलांवरचं आणि सचिन त्याचेच अनुभव सांगत बसतो. पण आठ-दहा पानं पुढे सरकल्यावर कळून येतं की, सचिन त्याचे अनुभव का सांगत होता. सचिनच्या जातीअंताच्या लढाईला वैचारिक धार देणारा माणूस म्हणजे काॅ. शरद पाटील.या पुस्तकात सचिनने शरद पाटलांचं भारतीय विचारविश्वातील महत्त्व अत्यंत योग्य आणि समर्पक शब्दात वर्णन केलंय. दुर्दैवाने समकालानाे काॅ. शरद पाटलांची अजिबात कदर केली नाही. मुळात आपल्या देशाची आणि महराष्ट्राचीच अशी पद्धत आहे की, जिवंतपणी कोणत्याही संतांचा, कलावंताचा आणि ज्ञानवंताचा छळच केला जातो, हे सचिनचं म्हणणं पटतं. काॅ. पाटीलही याला अपवाद ठरले नाहीत.


पद, पैसा आणि पुरस्कारापासून चार हात लांब राहाणारा हा सच्चा काॅम्रेड अखेरच्या काळात भयानकरित्या एकाकी पडला. नातेवाईकांनी घात केल्यावरही काॅ. पाटील खचले नाहीत, वैचारिक स्तरावर तर अनेकदा विरोध सहन करावा लागला, मात्र कुठेही माघार न घेता आपल्या ज्ञानाच्या आधारावर सर्वांनाच उत्तरं देत राहिले.

मार्क्सवाद आणि पोथीव…

ब्लॉगचं अर्धशतक !

Image
55 ब्लॉग झाले. अर्धशतक पूर्ण केलंय. अजून सुरुवात आहे. पण या अर्धशतकी खेळीत खूप वेगवेगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न केला. सर्वच जमलंय अशातला भाग नाही. पण कोणताही प्रकार वर्ज्य मानला नाही. पुस्तक परीक्षणापासून कथालेखनापर्यंत, ललितलेखापासून प्रवासवर्णनापर्यंत आणि विश्लेषणापासू अनुभव आणि आत्मपर लेखांपर्यंत.... बहुतेक विषयांना दुरून स्पर्श करण्याचा प्रयत्न केलाय.
19 फेब्रुवारी 2013 ला 'एक अनावृत्त पत्र' हा पाहिला ब्लॉग लिहिला. त्यानंतर काही दिवस सातत्य होतं लेखनात. मात्र, मध्यंतरी फार बरगळलं. मग गेल्या दीड वर्षांपासून लेखनात अधिक सातत्य आणण्याचा प्रयत्न केलाय. सातत्य नसण्याला दुसरं-तिसरं कारण नसून, माझा आळशीपणा आहे.


पहिला ब्लॉग वाचल्यावर मलाच माझ्या लेखनावर हसू येतं. इतकं वाईट लिहिलंय. पण असो.. ती सुरुवात होती. त्यानंतर प्रत्येक ब्लॉगगणिक लेखनशैली सुधारत गेलीय, असं मला स्वत:ला वाटतंय. कारण 19 फेब्रुवारी 2013 रोजीचा पहिला ब्लॉग आणि काल परवाचा ब्लॉग यात प्रचंड इम्प्रूव्हमेंट झाल्याचं माझं मलाच वाटतंय.
दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या लेखांना अनेक मोठमोठ्या माणसांनी दादही दिली. लेखनाची तारि…

दाद प्रवीण बर्दापूरकरांची...

Image
माझ्याच लेखनाला मी कधीच नावं ठेवत नाही. कारण जे काही तोडकं-मोडकं लिहितो, ते माझं असतं. जसं जमतं, जे सूचतं, जे मत असतं, ते ते मांडत जातो. वैयक्तिकरित्या एक माणूस म्हणून आणि ज्या माणसांमधून आलो त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी व्यक्त होतो. किंबहुना, हा एक आणि एकमेव उद्देश माझ्या लेखनाचा आहे.

आतापर्यंत जवळपास 50 हून अधिक ब्लाॅग झाले आहेत. अडीच-तीन वर्षांपूर्वी लिहिलेला पहिला ब्लाॅग आणि आजचा ब्लाॅग यामध्ये मला स्वत:ला प्रचंड सुधारणा जाणवते. दरम्यानच्या काळात लेखनाचे वेगवेगळेप्रकार ट्राय केले. सर्वच जमलंय अशातला भाग नाही. पुस्तक परीक्षण तर पार फसलं. कथालेखनही गंडलंय. गावाकडील प्रसंग, स्वत:चे अनुभव आणि विश्लेषणात्मक लेख, हे प्रकार त्यातल्या त्यात बऱ्यापैकी जमतायेत. बस्स. बाकी बट्याबोळच.

कसंही लिहिलं, तरी फेसबुकवर कमेंट आणि मेसेजमधून किंवा कधी प्रत्यक्षात कुणी भेटला, तर आवर्जून प्रतिक्रिया मिळतात. मात्र, परवा थोडं वेगळंच घडलं. पहिल्यांदाच.

आपलं लेखन अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नात असताना, ते लेखन अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीच्या नजरेखालून गेलं. ज्या व्यक्तीने लेखनशैलीवर हक्काने बोलावं, …

हुंदक्यांना सावली देणारा कवी : गुलजार

Image
या माझ्या कविता
तुझं चरित्र नसेल
माझं आत्मचरित्रही नसेल
माझ्या कविता
रात्रभर कोसळणाऱ्या पावसाच्या
नोंदी आहेत
कविता वाचणाऱ्याला प्रश्न पडतील
उत्तरे मिळतीलच असेही नाही
पाठमोऱ्या हुंदक्यांना इथे सावली मिळेल
गावची वेस ओलांडण्याची गरज भासणार नाही
एका गावात राहून इतिहास घडू शकतो.               - अरुण शेवते
अरुण शेवतेंनी ज्याप्रकारे त्यांच्या कवितांबद्दल हे वर्णन केलंय. अगदी तसंच वर्णन गुलजार साहेबांच्या कवितांबद्दल करता येईल. 
गुलजारांच्या कविता, गीतं, शायऱ्या हुंदक्यांना सावली देतात.
जगणं मांडतात.
जगवतात.
असंख्य क्षणांची घुसमट व्यक्त करतात.
एकांताला बोलतं करतात.
प्रांतांच्या सीमा गुलजार साहेब तडातड तोडून टाकतात.
‘आँखो को वीसा नहीं लगता’ ही त्यातलीच एक कविता. गुलजारांनी लिहिल्यानंतर प्रांतांच्या सीमाही जिथे धुसर होतात...
आँखों को वीसा नहीं लगता,
सपनो की सरहद नहीं होती
बंद आँखों से रोज़ मैं सरहद पार चला जाता हूँ
मिलने "मेहदी हसन से"
सुनता हूँ उनकी आवाज़ को चोट लगी है
और ग़ज़ल खामोश है सामने बैठी हुई
काँप रहे हैं होंठ ग़ज़ल के फिर भी
उन आँखों का लहजा बदला नहीं
जब कहते हैं...सूख गए हैं हैं फूल
किताबों मेंयार &q…

लेबलं

Image
अ : काल बाळासाहेबांचं भाषण ऐकलं रे... कसली ती शब्दफेक.. वाह! ब : तू तर बाळासाहेबांचा समर्थक दिसतोयेस. कट्टर शिवसैनिक वाटतं?
अ : काय पण बोला.. पवारसाहेबांवर कितीही भ्रष्टाचाराचे केले गेले तरी प्रत्येकाला एक मान्य करावेच लागेल की  पवारसाहेबांनी कधीही कुणावरही खालच्या पातळीवर जऊन टीका केली नाही. ब : राष्ट्रवादी समर्थक... क्या बात है... अरे तू मराठा आहेस का?
अ : राज ठाकरेला पण मानलं.. साला कसलं भाषण करतो. समोरच्याला पटवून देतो की त्याला काय म्हणायचंय. बाळासाहेबांचा खरा वारस तोच. ब : काय नाय रे.. नुसती पोपटपंची. असल्या नेत्यांना तू कशाला आदर्श मानतोस?
अ : मोदीला वैचारिक विरोध हा कायमच आहे रे... पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे. ब : म्हटलं ना की मी तूलाही एक दिवस नक्की पटतील मोदी.... पटलंच ना.
अ : कम्युनिस्ट विचारधारा मला इतर सर्व विचारधारांपेक्षा वेगळी आणि न्याय्य वाटते. कालानुसार काही बदल करायलाच हवे. प्रश्नच नाही. पण त्या विचारधारेला सरसकट मारु नये. कम्युनिस्टांचा तिरस्कार करु नये, असे मला मनापासून वाटतं. ब : क्रांतिकारकच का तू पण... नव्हे नव्हे कॉम्रेड.
वरील सर्व संवाद वेगवेगळ्या ठि…

आदरणीय (?) शोभाबाई!

Image
आदरणीय (?) शोभाबाई,
खरंतर तुमचं एकही पुस्तक मी आजतागायत वाचलं नाहीय. मला इंग्रजी फार जमत नाही आणि पेज थ्री कल्चरबद्दल वगैरे लिहिता, असं ऐकलं. त्यामुळे तसंही तुमच्या लेखनाला कधी स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला नाही. असो. तरीही हे पत्र तुम्हाला लिहितोय. पत्रकारितेतला नवखा पोरगा आहे. त्यामुळे चुकभूल द्यावी-घ्यावी.
परवा तुमच्याशी संबंधित बातमी करत होतो. आता बातमी काय असेल, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण हल्ली तुमच्या बातम्या अशाच प्रकारच्या होतात. अर्थात- वादग्रस्त विधानांच्या. आणि आताही तसाच विषय आहे- ऑलिम्पिक खेळाडूंच्या खिल्ली उडवण्याची. तर बातमी करताना तुमच्या नावापुढे'सुप्रसिद्ध लेखिका' अशी बिरुदावली अभिमनाने लावली आणि बॅलन्स बातमी केली. खरंतर मनात तुमच्या विधानाबाबत प्रचंड राग होता. पण बातमीत तो उतरु दिलं नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार वगैरे आठवलं. आणि बातमी तटस्थपणेच केली.
शोभाबाई, या पत्रातून मी माझं मत मांडणार आहे. ते तटस्थ वगैरे आहे की नाही, हे मला माहीत नाही. कारण हे पत्र वैयक्तिक आहे. या देशातील क्रीडाप्रेमी म्हणून आणि देशाचा नागरिक म्हणून थोडं तुमच्य…

पार्ट टाईम जॉब (भाग 1) : वडापावची गाडी

Image
दहावीपर्यंत गावी शिकलो. पुढील शिक्षणासाठी मुंबईला यायचं, हे आधीच ठरलेलं. मुंबईत कुठं राहायचं, काय खायचं, कसं राहायचं, हा नंतरचा प्रश्न होता. पण शिकायचं मुंबईतच, हे पक्क होतं. तस्सच झालं. दहावी झालो आणि मुंबईत आलो. काकांच्या येथे राहण्याची व्यवस्था झाली. खाणं-पिणं सर्व तिथेच. त्यांच्या घरातला एक सदस्य बनून राहिलो. विलेपार्लेतील आंबेवडीतील झोपडपट्टीत. ते नाही विमानतळाशेजारी आहे. तेच. पण इथे राहून शिकायचं, तर कामही करावं लागणार. कारण हातात पैसा असल्याशिवाय इथे पानही हालत नाही. त्यात कॉलेज वगैरे होतंच. मग अर्धवेळ नोकरी करण्याचं ठरवलं. मुंबईत या संकल्पनेला पार्ट टाईम जॉब असं प्रतिष्ठित शब्द आहे. काम कोणतंही असो, पार्ट टाईम जॉब करतोय म्हटलं की, त्याला एक वेगळाच स्टँडर्ड यायचा. असो. तर म्हटलं पैसा आवश्यक आहे. पावलोपावली खर्च वाढतोय. किमान वरखर्चाचे तरी पैसे आपण जमा केले पाहिजेत. मग आयुष्यातील आणि मुंबईतलाही जॉब सुरु केला- वडापाव विकण्याचा.
तुम्ही कधी मुंबईत आला आहात का? आला असाल, तर तुम्हाला आता सांगेन, ते ठिकाण कळेल. ते म्हणजे- अंधेरीहून दादरच्या म्हणजेच शहराच्या दिशेने निघालो की, अंधेरी सोड…

पप्पांची डेडबॉडी बघायला गेलेली आई!

Image
खूपच दर्दभरा वगैरे लिहितो, अशी अनेकांची माझ्याबाबत तक्रार असते. त्यांची माफी मागूनच हे लिहितोय. कारण काल्पनिक वगैरे लिहायला फार जमत नाही. जे अनुभवलंय, जे जगलोय, जे पाहिलंय, ते मांडतो. किंबहुना, तेच मांडता येतं. बाकी काल्पनिक लिहायला गेलो की, दहा-पंधरा ओळींपलिकडे लिहिणं जमतच नाही. म्हणून जगण्यातलचे काही क्षण मांडत असतो. दुसरी गोष्टी अशी आहे की, मला व्यक्त व्हायचं असतं. बस्स.
विशेषत: पप्पांच्या आत्महत्येवरील बापाने आत्महत्या केली तो दिवस!हा लेख वाचल्यानंतर अनेकांनी पर्सनली फोन करुन तक्रार केली की, असे भयानक काही लिहित जाऊ नकोस. असे लेखन अंगावर येतं. झोप लागत नाही. मला त्यांचं म्हणणं पटतं, पण मला दुसरं लिहिता येत नाही. माझं लेखन हे माझं जगणं आणि माझं भोवताल मांडत राहतं. आजही तेच करणार आहे. जगण्यातला एक भयानक क्षण मांडणार आहे.
पाच दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे महाडच्या सावित्री नदीचा पूल पाण्याच्या वेगवान प्रवाहात मध्यरात्री वाहून गेला. कित्येक जणांचं आयुष्य त्या पाण्यात वाहून गेलं. तडफडत. कुणाचा काही पत्ता नाही. या भयानक घटनेने माझ्या आयुष्यातील एका प्रसंगाची आज तीव्र आठवण झाली. अर्थात,…