Posts

Showing posts from July, 2016

इंग्रजी साहित्य आणि मी

Image
मी मराठी वाचक. म्हणजे मराठी भाषेतील साहित्य आणि इतर भाषेतून मराठीत आलेले साहित्य, यापलिकडे फारसं वाचन होत नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अर्थात भाषेचा अडसर. गेल्या दीड-दोन वर्षांपासून इतर भाषेतील साहित्य वाचन गंभीरपणे सुरु केलं आहे. पण ते इतर भाषेतून नव्हे, तर मराठी अनुवादित-भाषांतरित झालेलं साहित्य वाचतोय. प्रत्येक साहित्य त्या त्या भाषेतीलच,म्हणजेच मूळ साहित्य वाचावं, असं सारखं वाटतं आणि अनुवादन वाचल्यानंतरही ती खंत कायम राहते. कारण मूळ भाषेतील साहित्य वाचण्यात वेगळी मजा आहे.

उदाहरणादाखल सांगायचं तर, आपण हमीद दलवाई यांच्या इंधन कादंबरीचं उदाहरण घेऊ शकतो. मराठीतील मूळ इंधन आणि दिलीप चित्र यांनी इंग्रजीत ट्रान्सलेट केलेली ‘Fuel’, या दोन एकच कादंबरी असल्या, तरी वाचताना कुठेतरी भाषेमुळे फरक जाणवतोच. चित्रेंनी खूप छान ट्रान्सलेट केलीय. पण तरीही मराठीतील वाचण्यात जी मजा आहे, ती मजा इंग्रजी ट्रान्सलेशन वाचताना जाणवत नाही. असो.

कथा, कादंबरी किंवा अगदी कविता असो, यांमधून त्या त्या राज्यातील, देशातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थिती आपल्याला कळते किंवा त्याचा किमान कानोसा घेता येतो. …

उमाक्का गेली!

Image
उमा आक्का गेली. व्हॉट्सअप ग्रुपवर उमा आक्काच्या निधनाचा मेसेज आला. RIP आणि रडण्याचे दोन सिम्बॉल, असा रिप्लाय ग्रुपवर दिला. गावाकडचं कुणी गेलं की, हल्ली असं मेसेजवरच कळतं. फोनकरुन सांगण्याची पद्धत आता इतिहासजमा झालीय. अशा बातम्या कळल्या की, RIP आणि रडण्याच्या सिम्बॉल टाकून जसं आधी चाललंय, तसंच पुढे सुरु होतं. कदाचित या शहरात येऊन संवेदनाच बोथट झाल्या असाव्यात. माहित नाही. पण आज उमा आक्काच्या निधनाची वार्ता कळली आणि तिच्या खूप आठवणी डोळ्यांसमोर सरकू लागल्या.
उमा आक्का तशी आमच्या नात्यातली नव्हती आणि आमच्या गावातीलही नाही. ज्या गावात शाळेत शिकायला जायचो, त्या गावातली उमा आक्का. आमच्या गावापासून जवळपास दोन-अडीच किलोमीट दूर. शाळेत असताना उमा आक्काची माया आम्हाला अनुभवता आली.
म्हसाडी नावाच्या गावात आम्ही शाळेत जायचो. गावाच्या वेशीवर शाळा. मात्र, दुपारच्या सुट्टीत या गावातील दुकानात काही ना काही खायला घेण्यासाठी जायचो. त्यावेळी आवर्जून उमा आक्काच्या घराकडून फेरफटका मारायचो. गावात शिरता पहिलंच घर उमाक्काचं. कोणत्याही परवानगीशिवाय घरात शिरण्याची आणि स्वत:च्या हाताने पाणी घेऊन पिण्याची, हात-पाय ध…

नगरची निर्भया आणि जातीचा चष्मा

Image
निर्भया कोण?


अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डीत माणूस म्हणवून घ्यावयास लाज वाटावी इतका भयानक बलात्कार एका अल्पवयीन मुलीवर करण्यात आला. बलात्कारानंतर नराधमांनी मुलीची निर्घृणपणे हत्या केली. 25 जून 2001 रोजी जन्मलेली निर्भया अवघ्या 15 वर्षांची होती. कर्जतमधील नूतन माध्यमिक महाविद्यालयात नववीच्या वर्गात निर्भया शिकत होती.


घटना काय आहे?


13 जुलै 2016. नेहमीसारखाच दिवस. निर्भया कुळधरणहून म्हणजे आपल्या शाळेतून घरी आली. घरी आल्यावर तिच्या आईने तिला आजोबांच्या घरातून मसाला आणायला सांगितले. 15 वर्षीय निर्भया सायकलने आजोबांच्या घरी गेली. मसाला घेऊन निर्भया आजोबांच्या घरातून निघाली. त्याचवेळी नराधम आजोबांच्या घरापाशी दबा धरुन बसले होते. निर्भया घरी परतत असताना नराधमांनी तिला अर्ध्या रस्त्यात गाठले आणि रस्त्याशेजारी माळरानावर नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार केला. इतका की माणूस म्हणून घेण्याचीही लाज वाटावी.


नराधमांनी असा केला अत्याचार


नराधमांनी अत्याचार कसा केला, हे मुद्दाम इथे देतोय. याचं कारण तुम्हालाही कळेलं की, माणूस किती निच आणि विकृत दर्जाचा असू शकतो. नराधमांचं कृत्य वाचल्यावर तळपायाची…

संतपरंपरा आणि मी

Image
चौथीत असताना स्वत:हून आणि पाचवीत असताना माझ्या हट्टापायी, असे दोनदा आजोबांनी मला पंढरपूरला नेले होते. अर्थात विठू-रखुमाईच्या दर्शनाला. जवळपास दीड दिवस रांगेत उभं राहून विठूरायाचं दर्शन घेतलं होतं. तेही तिथल्या पूजाऱ्यांनी पायाला स्पर्शही करु दिला नव्हता. स्पर्शाला हात पुढे करणार, तोच धक्का देत बाजूला सारत होते.
चंद्रभागेच्या तिरी सकाळी अंघोळीनंतर चार आणे देऊन कपाळी टिळा लावून दिवसभर विठूनामाच्या गजरात सामील व्हायचो. अशाप्रकारे लहानपणापासूनच संतपरंपरा मनात रुजलीय.
आजोबा वारकरी सांप्रदयातील होते. तुळशीमाळ वगैरे घातली नव्हती. पण विठ्ठलाचे परमभक्त. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक वाऱ्या केल्या. पायीही. तेच नाही, आमच्या गावाकडे वारकरी सांप्रदय प्रचंड मोठा आहे. राम सांप्रदाय आत्ता आता नानासाहेब धर्माधिकाऱ्यांमुळे पसरत चाललाय. असो.
तर आजोबांचं विठ्ठल आणि संतपरंपरेवरील प्रेमापोटीच माझं नाव ज्ञानेश्वर. पुढे शाळेत प्रवेश घेताना कुणीतरी ज्ञानदेव सांगितलं आणि गुरुजींना कमी ऐकू आलं बहुतेक, तर त्यांनी लिहिताना नामदेव लिहिलं. मग ज्ञानेश्वरचं ज्ञानदेव आणि ज्ञानदेवाचा नामदेव झालं. आताही गावात ज्ञानदेव म्…