Posts

Showing posts from June, 2016

दिग्गजांच्या अनुभवांचा संच : उतरतात त्या आठवणी

Image
तुमच्या आठवणी तुम्हाला खूप काही शिकवणाऱ्या असतात. मग थोरा-मोठ्यांच्या, ज्यांनी समाजमनावर आपली वेगळी छाप पाडली हे, ज्यांनी सार्वजनिक आयुष्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, अशा दिग्गजांच्या आठवणी किती मोलाच्या आणि महत्त्वाच्या असू शकतात, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. असाच अनुभवांचा संच म्हणजे “उरतात त्या आठवणी”
आठवणी खऱ्या बोलतात. आठवणी कधीच फसवत नाहीत. त्या तुम्हाला तुमच्या खऱ्या आयुष्याची सफर घडवतात. मुळात त्यांना खोटं बोलताच येत नाही. शिवाय, आठवणी कधीच वैयक्तिक नसतात. माणसं आठवणींना ‘वैयक्तिक’ चौकटीत डांबून ठेवतात. त्यांना मोकळा श्वास देत नाहीत. तो देणं गरजेचं आहे. कारण आठवणी या अनुभवांचं संच असतात. अनुभवांचं एकत्रिकरण म्हणजेच आठवणी. मग अनुभव इतरांपर्यंत पोहोचलेच पाहिजेत... अशाच प्रकारे थोरा-मोठ्यांच्या अनुभवांच्या आठवणी या पुस्तकातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अरुण शेवते सरांनी केला आहे. हे पुस्तक ‘ऋतूरंग’ दिवाळी अंकातील अनुभवाधारित लेखांचा संग्रह आहे.
मेहरुनिस्सा दलवाई यांचं हमीदभाईंवरील ‘अंतर’, दया पवार यांचा ‘बलुत्यातील रिकामी जागा’, मंगला नारळीकरांचा ‘उरतात त्या आठवणी’ ह…

बब्या....

Image
परवा गावी गेलो तेव्हा बब्याचं घर बंद दिसलं. घराला टाळं होत. बाजूला चौकशी केली, तर कळलं बब्या आता फार घरी राहत नाही. इकडे तिकडे फिरतच असतो. बायकोशी भांडण आणि दारुच्या धंद्यातील चढउतार त्याला आता सहन न होण्याएवढे वाढलेत. तो अस्वस्थ असतो. निराश वगैरे. बब्याचा धंदा वाईटच. पण तरीही तो माणूस म्हणून भारी होता. मदतीला धावून येणारा.
बब्या... रखरखत्या उन्हाने काळाकुट्ट झालेला साडे सहा फुटी 45 वर्षांचं आडदांड शरीर, ढेरपोट्या बोंगा, मधोमध टक्कल आणि उरल्या डोक्यावर पांढरे पडत चाललेले बारीक केस, हाफ पँट घालून, शर्ट न घालता तो एका खांद्यावर टाकलेला आणि दुसऱ्या खांद्यावर 15-20 लिटरचा दारुचा ड्रम उचलून रस्त्याने नेपोलियन बोनापार्ट असल्यागत राजावाणी पावलं टाकत चालायचा..... बब्या म्हटल्यावर त्याचं हेच रुप माझ्या डोळ्यासमोर येतं.
पंचक्रोशीतील आदिवासी पाड्यांवर दारु पाडली जायची. आजही लपून-छपून पाडली जातेच. पण तेव्हा सर्रास उघडपणे धंदा सुरु होता. बब्या या पाड्यांवरुन दारु विकत आणून आपल्या घरी ठेवायचा आणि तिथून विक्री करायचा. पंचक्रोशीतील तमाम म्हातारे बब्याचा घर गाठल्याशिवाय घरी परतायचे नाहीत. बब्या उधारी ठे…