Posts

Showing posts from March, 2016

तांबव्याचा विष्णूबाळा!

Image
काही दिवसांपूर्वी 'बाबांची शाळा' पिक्चरच्या प्रमोशनसाठी अभिनेते सयाजी शिंदे ऑफिसमध्ये (एबीपी माझाचं ऑफिस) आले होत. तेव्हा त्यांना मी पहिल्यांदा प्रत्यक्षात पाहिलं. आता सयाजी शिंदेंना पाहण्यात काय मोठं आलंय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. त्यात गैर नाही. मात्र सयाजी शिंदेंना प्रत्यक्षात पाहणं, माझ्यासाठी काही खास होतं.
आमच्या गावात कधी सयाजी शिंदेंना घेऊन गेलो, तर त्यांचे पाय धुवून पाणी पितील, अशी परिस्थिती आहे. गावाकडं सयाजी शिंदेंचं इतकं वेड असण्याचं कारण 'तांबव्याचा विष्णूबाळा'.
या पिक्चरनं अक्षरश: वेड लावलेलं गावात. 'तांबव्याचा विष्णूबाळा' पाहिला नाही असा डोचका शोधून सापडायचा नाही.
काय होतं त्या पिक्चरमधी एवढं की, घरपट बघावं? तर त्यात होतं अन्यायाविरोधातील आवाज, भाऊबंदकीतील वाद, गावपातळीवर सरपंचाचं राजकारण, निर्दोषाची फसवणूक... आता या साऱ्यांशी गावाकडची माणसं जोडली जाणार नाहीत, हे कसं शक्यय? लोकांशी थेट कनेक्ट होणारा हा विषय. त्यात सयाजी शिंदेंच्या अभिनयाची जोड. आणखी काय हवंय?
बरं हा पिक्चर काही रंगीत टीव्हीवर वगैरे पाहिला नाही. गावात फक्त दोन जणांकडे टीव्ही होता…

खिडकीतला चंद्र

Image
‘वय: वादळविजांचं’ हे प्रवीण दवणेंचं पुस्तक वाचलं तो महिना होता मार्च. मी मुंबईतील साठ्ये महाविद्यालयात बीएमएमच्या दुसऱ्या वर्षात शिकत होतो. अतिशय महत्त्वाची परीक्षा होती. त्यात पार्ट टाईम जॉब करत होतो. मालाडच्या लिबर्टी गार्डनजवळ जयप्रकाश तिवारी नावाचे सीए आहेत, त्यांच्याकडे काम करत असे. एप्रिलमध्ये परीक्षा होत्या. त्यामुळे परीक्षा तोंडावर आणि त्यात सीएच्या येथे कामाला म्हणजे ऑडिट, रिटर्न फाईल वगैरे हजार कामं. कामा खूप होतं. त्यामुळे तिवारी सर सुट्टी द्यायला तयार नव्हते. परीक्षेच्याआधी दोन दिवसांपासून सुट्टी देण्याची मात्र त्यांची तयारी होती. आता दोन दिवसांत पूर्ण अभ्यास कसा करता येईल, याची चिंता. प्रचंड कन्फ्युज्ड होतो. जॉब सोडायचा, तर नवा जॉब मिळत नसे. प्लेसमेंटवाल्यांन १५०-२५० तर कधी कधी ५०० रुपये द्यावे लागत.अंधेरीच्या जम्बो दर्शनमधील गजानन प्लेसमेंटम, दादरच्या सुविधाच्या बाजूला असलेलं प्लेसमेंट ऑफिस, अंधेरीतील टाईम्स प्लेसमेंट या साऱ्यांना पैसे देऊन आणि नोकरी आलीय का, हे विचारण्यासाठी फेऱ्या घालून आधीच थकलो होतो. त्यामुळे नोकरी सोडायची नाही, हे निश्चित होतं. त्यात हा जॉब ओळखीने ल…

मानवाच्या भविष्याची चिंता करणारा ‘लिओनार्डो’

Image
काही निवडक उद्योजकांना त्यांच्या आर्थिक हव्यासापोटी संपूर्ण मानवजातीचं भविष्य निश्चित करण्याचे अधिकार आपण का देतो आहोत? – लिओनार्डो
लिओनार्डोला ‘ऑस्कर’ मिळाला. खूप आनंद झाला. कारण अभिनयासह हा एक सजग माणूस आहे. त्याच्या अभिनयाबद्दल फार बोलणार नाही. कारण 'टायटॅनिक' सोडला तर त्याचा कोणताच सिनेमा मी पाहिलेला नाही. पण तरीही त्याचा मोठा फॅन आहे ते त्याच्या सिनेमाव्यतिरिक्त इतर कामामुळं.
लिओनार्डो पर्यायवरणाबाबत प्रचंड जागरुक आहे. तो पर्यावरणवादी चळवळीत अॅक्टिव्हली काम करतो. यूनोने कुठल्यातरी समितीवरही त्याची नेमणूक केलीय आणि पर्यावरण क्षेत्रातील कुठलातरी महत्त्वाचा पुरस्कारही त्याच्या नावे आहे. मला आता नाव आठवत नाही. क्रिस्टल की बिस्टल असं काहीतरी नाव आहे पुरस्काराचं. असो. तर एकंदरीतच भारी माणूस आहे हा.
स्वीत्झर्लंडमध्ये जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पार पडलं ना, त्यात लिओनार्डोचं एक भाषण झालं होतं. मीही या भाषणाच्या बातम्या वाचल्यात. कुठे व्हिडीओ-ऑडिओ क्लिप मिळाली नाही. पण त्याच्या या भाषणाची जगभरातील प्रमुख प्रसारमाध्यमांमध्ये प्रचंड चर्चा झाली होती.
या फोरममधील भाषणातील लिओनार्डोचा एक प्रश…