Posts

Showing posts from February, 2016

कथा : आभ्या आणि त्याची तडफडणारी आय!

Image
तो आभ्यासारखा वाटला म्हणून मी वळून पाहिलं. खात्री झाली नाही म्हणून पुढे चालू लागलो. पुन्हा मनात आलं, हा आभ्याच असावा. म्हणून पुन्हा वळून पाहिलं...दोन पावलं चाललो. परत पाहिलं. अखेर मागे फिरलोच.

त्या इसमाच्या जवळ गेलो. आणि म्हणालो, “मी तुम्हाला कुठेतरी भेटलोय.”
तो इसम चक्क “नाही” म्हणाला.
ओळखीचा नसला तरी थोड्या वेगळ्या प्रतिक्रियेची अपेक्षा होती. म्हणजे, ‘कुठे भेटलोय आपण?” किंवा “सॉरी, मी ओळखलं नाही तुम्हाला” अशी जनरली येणारी प्रतिक्रिया येईल, असं वाटलं होतं... पण तो चक्क “नाही” म्हणाला.

मग मीच म्हटलं, “मी ज्ञानेश्वर फणसाळकर”
त्याचा चेहराच बदलला. मी ओळखीचा आहे, अशा एक्स्प्रेशन्सनी तो माझ्याकडे पाहू लागला. तो काही बोलणार एवढ्यात मी पुढे म्हटलं' “तू आभ्या ना?”
तो- काय ज्ञान्या आहेस कुठे?
मी- च्याआयला हा प्रश्न मी तुला विचारायला हवा होता. साला तुच मला विचारतो आहेस.
तो- अरे कुठे नाय.. असतोय इकडचे.

त्याला म्हटलं चल त्या टपरीवर चहा पिता पिता बोलू. खरंतर तो घाईत होता. पण तो माझ्यासमोर काही बोलला नाही. चेहऱ्यावर लवकर निघायचंय अशा एक्स्प्रेशन्स होत्या. मात्र, मी मुद्दाम त्याला थांबवलं. रस्ता ओलांडून …

सचिन परब: लिहिण्याचं निमित्त, इन्स्पिरेशन वगैरे

Image
त्याचं असंय की तुमच्या लिहिण्यालाही निमित्त असतं. म्हणजे विषय सुचायला वगैरे नाही. तर अॅक्च्युअल लेखन करण्यास. म्हणजे उदाहर्णार्थ तुम्ही वाचता..मग वाचनातील आवडत्या किंवा नावडत्या मुद्द्यावर लेखन करता. मत मांडता. एकंदरीत प्रतिक्रिया देता. म्हणजे त्याच्यासाठी 'वाचन' हे निमित्त ठरतं. काहीजण तर ठरवून लिहितात. पण ठरवून लिहिणारे लिखाणात सातत्य ठेवत नाहीत, असा माझा (कुणी विचारात घेत नसला तरी) आरोप आहे. कारण लेखन हे आतून आलं पाहिजे. आता आतून म्हणजे कुठून हे विचारु नका. ती बोलण्याची एक स्टाईलय. तरीही सांगायचं झाल्यास, लेखन हे 'सूचलं' पाहिजे. उगाच चार शब्दांना खेचायचं, ताणायचं आणि त्यांच्या चार ओळी करायच्या, याला काडीचाही अर्थ नसतो. दोन पानी लेखन एका पानात संपत असेल तर तिथंच संपवावं. उगाच वाढवलं की ते बोरिंग होतं, असं माझं स्ट्रिक्टली पर्सनल मत आहे. असो. आपण मुद्द्यावर येऊया. तर लेखनाला कुणी-ना-कुणीतरी निमित्त असतंच. माझ्या लेखनाला निमित्त ठरले- मी ज्यांना कधीच पर्सनली भेटलो नाही, कधीही वन-टू-वन बोललो नाही, असे सचिन परब सर.


सचिन परब हा इसम किती फूट उंच किंवा दिसायला गोरा की काळा..…