Posts

Showing posts from January, 2016

राजन आजोबा: माणसं जोडणारा अवलिया

Image
काही माणसांच्या रक्तात प्रेमाचं केमिकल मिक्स झालेलं असावं बहुतेक. प्रचंड म्हणजे प्रचंड प्रेमळ असतात ही माणसं. अशी माणसं आपल्या वाटेत कायमच भेटत असतात. यांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल, इतकीच असते. पण अशी माणसं या जगात आहेत हे नक्की. 'माणसं जोडणं' या पलिकडे यांच्या आयुष्यात महत्त्वाचं असं काही नसतं. पावलो-पावली निर्दयी माणसांचा ढीग पाहिल्यावर अशा माणसांकडे पाहून मला प्रचंड अप्रूप वाटतं.
'राजन आजोबा' असं टायटल देऊन हे काय भलतंच सांगत सुटलाय, असा प्रश्न मला तुमच्याच चेहऱ्यावर दिसतोय. सांगतो... त्यांच्याबद्दलच सांगतो. ही सुरुवात त्यांच्यासाठीच होती. कारण मी आज ज्या राजन आजोबांबद्दल सांगणार आहे, ते वर उल्लेख केल्याप्रमाणे 'हाताच्या बोटांवर मोजता येतील', अशांपैकी एक आहेत. जगावेगळा माणूस.
राजन आजोबा. वय वर्षे सत्तरी पार. आजोबा वगैरे बोलून त्यांचा अपमान केल्यासारखंच होईल. कारण हे चिरतरुण व्यक्तिमत्व आहे. पण पहिल्यापासून आजोबा बोलण्याची सवय असल्याने आजोबाच म्हणतो.
तेव्हा मी नुकताच पार्ल्यातील हनुमान रोडवरील इमारतींमध्ये पेपरलाईन टाकायला सुरुवात केली होती. माझ्य…

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

Image
आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते केवळ त्याचं शरीर घेऊन नव्हे तर.. तो कोसळला माझ्यासाठी, माझ्या भावासाठी, माझ्या आईसाठी, माझ्या बहिणीसाठी शेतात लढता लढता कोसळला.. तो कोसळला माझ्या स्वप्नांना उंच भरारी घेण्यासाठी माझ्या पंखांना बळ दिल्यावर...
23 जूनला पप्पा आम्हाला सर्वांना सोडून गेले. कायमचे. वयाच्या सत्तेचाळीसाव्य वर्षी त्यांचं जाणं मलाच काय कुणालाच अपेक्षित नव्हतं. किंबहुना त्यांनीच स्वत:त्यांच्या आयुष्याचं अस्तित्व संपवलं. आत्महत्या करुन.
दिनांक२३ जून २०१४
मी नुकताच पेपरलाईन टाकून घरी आलेलो.घड्याळाकडे पाहिलं तेव्हा साडेआठ वाजलेले.हात-पाय धुवूनसवयीप्रमाणे पलंगावर पडलो होतो. आदल्यादिवशी सेकंड शिफ्ट म्हणजे दुपारी 3 ते रात्री 12 अशी शिफ्ट केलेली. त्यात रात्री एक वाजता घरी येऊन पुन्हा सकाळी चार वाजता पेपरलाईन टाकून आलो होतो. त्यामुळे अंगात थकवा आणि डोळ्यांवर झोप होती. त्यात भरीस भर म्हणजे पुन्हा थोड्याच वेळात जनरल शिफ्टला निघायचं होतं. म्हणजे दहा वाजता. घड्याळाने नऊचा ठोका दिला. म्हटलं अर्धा …

ही माझी हतबलता की देशातील वस्तूस्थिती?

Image
रोहिथ वेमुला दोस्ता,
तू आत्म'हत्या' केलीस. तुझ्या मृत्यूला ही व्यवस्था म्हणजेच आम्ही सारे जबाबदार आहोत, हे सर्वप्रथम मान्य करतो. कारण ही वर्तमान व्यवस्था-सत्ता ही आमच्या मताची देण आहे. तुझ्या जाण्याने खूप दु:ख झालं, तुझं बलिदान व्यर्थ जाणार नाही, तू भगतसिंह आहेस, तू लढवय्या आहेस वगैरे वगैरे खूप काही यापुढचे काही दिवस बोललं जाईल. दोस्ता, यातील ‘काही’ शब्द मुद्दामहून वापरला आहे. कारण काहीच दिवस हे असणार आहे. मग तूही आमच्या दाभोळकर-पानसरे-कलबुर्गींच्या रांगेत चौथ्या नंबरवर जाऊन बसशील. म्हणजे ‘शाहू-फुल-आंबेडकरांचा महाराष्ट्र’ असं नाही का बोललं जातं, तसं हल्ली ‘दाभोळकर-पानसरे-कलबुर्गीं’ म्हटलं जातं. आता यात तुझं नाव. बस्स बाकी काही फार होणार नाही. याची दुर्दैवाने खात्री वाटते.
दोस्ता, अगदीच काही निराशा नाही. काल आणि आज तुझ्या समर्थनासाठी खूप आंदोलनं झाली. तशी यापुढेही होत राहतील काही दिवस. हेच काय ते सकारात्मक चित्र. बाकी काळाकुट्ट अंधारच. कारण आगामी आठवडाभर मोर्चे निघतील, पोलिसांचे मार खाऊन मोर्चातील कार्यकर्ते परत घरी जातील. घरी त्याचा आई-बाप त्याला दणके देईल. मेल्या उद्या पोलिसांच…

आशादायी चित्रावर रेघोट्या ओढणारा 'पठाणकोट हल्ला'

Image
मुळात भारत आणि पाकिस्तानात अशी काही डोचकी आहेत, ज्यांना भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सौहार्दाचे संबंध निर्माण व्हावे, असे वाटत नाही. त्यामुळेच या शक्ती भारत-पाकिस्तान चर्चा होण्याच्या मार्गावर असली, की त्यात खोडा घालतात. पठाणकोट हल्ला हा त्याच शक्तींनी केला आहे, हे स्पष्ट आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानात जाऊन पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली. त्यामुळे भारत-पाकिस्तान या दोन देशांमध्ये चर्चा होऊ शकते, अशी आशा निर्माण झाली. दोन्ही देशांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, दहशतवादी शक्तींना हे पाहावत नसल्याने त्यातून पठाणकोट हल्ला करण्यात आला. मुळात हे नेहमीचंच झालं आहे. भारत-पाकिस्तान चर्चा होणाच्या मार्गावर असली की, नेमकं देश विघातक शक्ती सक्रीय होतात.
आता खरंतर भारताने पाकिस्तानशी चर्चा रद्द न करता, उलट चर्चा करुन दहशतवाद्यांना उत्तर द्यायला हवं. खरंतर भारतानेच नव्हे, पाकिस्ताननेही चर्चेसाठी पुढाकार घ्यायला हवा. जोपर्यंत दोन्ही देशांमध्ये दहशतवाद किंवा इतर वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा होत नाही, तोपर्यंत भारत-पाक संबंध कायम ताणलेलेच राहतील.
त्या…