Posts

Showing posts from December, 2015

प्रिय गुरुजी

Image
प्रिय गुरुजी,
आज तुमचा स्मृतीदिन. 24 डिसेंबर 1899 साली कोकणातील पालगडमध्ये तुमचा जन्म झाला. ज्या ‘श्यामची आई’मधून तुम्ही जिला अजरामर केलंत, त्या यशोदामायेच्या पोटी. खरंतर हे सागंण्याची वेळ आलीय, हेच मोठं दुर्दैव. कोण होते साने गुरुजी, असा कुणी प्रश्न विचारला, तर फार फार तर आगामी चार-पाच वर्षांत उत्तर मिळू शकेल. मात्र, ‘पांडुरंग सदाशिव साने’ कोण, असा प्रश्न आज विचारल्यास, पृथ्वीची निर्मिती कशी झाली, हा प्रश्न विचारल्यावर जशा चेहऱ्यावर एक्स्प्रेशन्स असतात, तशा दिसतील. आणि हे मला आश्चर्यकारक वाटत नाही. कारण हल्ली केजी-बिजी किंवा ट्युशन वगैरे या शाळेआधीच्या शाळेमुळे तुमचे विचार मुलांपर्यंत पोहोचतच नाहीत. फार-फार तर सातवी-आठवीपर्यंत मराठी पुस्तकातील एखाद्या धड्यात तुम्ही बंदिस्त झाला आहात.
आता विशी-तिशीत असलेल्यांना बऱ्यापैकी आणि त्याहून वयाने मोठे असलेल्यांना जरा नीटसं तुमचं कार्य माहित आहे. बाकी सर्व बट्याबोळ आहे. त्याबद्दल या पिढीचा प्रतिनिधी म्हणून सॉरी.. खरंतर मी माफी मागितलेलं तुम्हाला आवडणार नाही. कारण आपल्या विद्यार्थ्याने कायम स्वाभिमानाने राहावं, अशी तुमची कायम इच्छा असायची. असो.…

सायकल: एक सोबती

Image
कधी-कधी माणसांसोबत काही निर्जीव गोष्टीही आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान निर्माण करतात. त्यांचं आपल्या आयुष्यातील महत्त्व मोलाचं असतं. किंबहुना अनेकदा आपल्या चढ-उतारात त्यांची मोलाची साथ असते. पण आपण कधीच त्या निर्जीव वस्तूंचे आभार मानत नाही. माझ्याही आयुष्यात अत्यंत महत्त्व असणारी एक गोष्ट म्हणजे- सायकल.
सकाळी पेपरलाईन टाकण्यासाठी पेपरलाईनचा मालक म्हणजेच सुभाष दादा आणि मी, दोघांनी मिळून ही सेकंड हँड सायकल विकत घेतली होती. पार्ल्यातील महिला संघ शाळेजवळील जाफरभाईकडून. सकाळी साडेचारला उठून मला वाऱ्याच्या वेगाने काम करायला या सायकलने शिकवलं. पावसातूनही या सायकलने कधी अर्ध्या रस्त्यात धोका दिला नाही. कधी सायकल पंक्चर झाली तर चालत पेपरलाईन टाकायचो, मात्र एखादा दिवस वगळता कुणा दुसऱ्याची सायकल घेतलेली आठवत नाही.
पेपरलाईनच्या पगारातून मी पहिला कॅमेरा मोबाईल घेतला, अनेक पुस्तकं खरेदी केली. वेळोवेळी वरखर्चाचे पैसेही पेपरलाईनमधून सुटत असत. आणि या साऱ्यामध्ये या सायकलचा मोठा वाटा आहे. वेगात सायकल चालवून पेपर टाकायचो. कारण तिथून कॉलेजला वेळेवर पोहोचावं लागायचं. अनेकदा रिक्षाशी शर्यत लावायचो.. कधीही…

शिवी

Image
हजार शब्दांच्या बरोबरीचं एक चित्र असतं, असं कायम म्हटलं जातं. शिव्यांबाबतही माझं तेच निरीक्षण आहे. एखाद्याविरोधातला राग एखादा टीकात्मक लेख लिहून व्यक्त होऊ शकत नाही, तेवढा राग 'च्युत्या साला' या दोन शब्दात व्यक्त होऊ शकतो, असं माझं मत आहे. शिव्यांची किमयाच न्यारी राव!
परवाचीच गोष्ट: एक मित्र म्हणाला, "तो मूर्ख आहे. नालायक कुठला. मला फसवलं त्याने. त्याचं भलं नाही होणार." हे सारं बोलत असताना माझा मित्र दात चावत होता.. बहुधा खूप राग वगैरे आला असेल. मी त्याला म्हटलं, "ज्याच्यावर राग आहे ना त्याला मनातल्या मनात तुला माहित असलेल्या उच्च दर्जाच्या शिव्या हासड. बघ तुला थोडं बरं वाटेल." लेकाच्याने पटकन तसं केलं. थोडा चेहरा फुलला गड्याचा. म्हटलं ना शिव्यांची किमयाच न्यारी!
बोली भाषा बारा पावलांवर बदलते, असं म्हणतात.. तशा शिव्याही. दर वीस-पंचवीस गावं ओलांडली की नव-नव्या शिव्या ऐकायला मिळतात. बरं..काही शिव्यांना स्वत:ची अशी लय आहे. 'काय रे भाड्या' म्हणताना एक सूर लागतो... तसंच 'भुसनळ्या' म्हणतानाही.
काही शिव्यांनी तर दैनंदिन व्यवहारात शिरकाव केलाय. म्हण…

योद्धा शेतकरी

Image
हा तो काळ आहे जेव्हा भारतातील शेतकरी अंधारात चाचपडत होता. नैसर्गिक संकटांनी शेतकरी पुरता त्रासलेला होता. सुलतानी संकटं टाळता येत नव्हती. त्यात भरीस भर म्हणजे ज्यांनी मदतीला धावून यायचं, त्या माय-बाप सरकारने तर अक्षरश: थट्टा सुरु केली होती. सरकारविरोधात लढण्याची ताकदही शेतकऱ्यांमध्ये नव्हती आणि अशाच महासंकटाच्या काळात शेतीच्या क्षितिजावरुन सरकारच्या निष्ठूर धोरणांविरुद्ध शरद जोशी नावाचं एक वादळ घोंघावलं...
शेतकरी तितका एक एक
शरद जोशींनी शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. शेतकऱ्यांच्या मनात स्वभिमानाने जगण्याचं बीजारोपण केलं. ताठ मानेनं आणि मूठ आवळून घामाच्या दामासाठी लढा देण्याचा मंत्र दिला. शेतकऱ्यांच्या मनातील सत्ताधाऱ्यांची भीती कायमची घालवली.शेतीला अर्थशास्त्रीय बैठक निर्माण करुन दिली.‘शेतकरी तितका एक एक’ हा नारा देऊनशरद जोशींनी शेतकऱ्यांनाजात, धर्म,प्रांत, भाषा हे भेद विसरुन जगायला आणि लढायलाशिकवलं.
स्वित्झर्लंड ते शेतकरी...
स्वित्झर्लंडमधील