Posts

Showing posts from October, 2015

माझं गाव योग्य दिशेने बदलतंय!

Image
'पी की मेल्या त्वांड लावून पाणी. टीबी झालाय काय तुला? माणसासारखा माणूस तू. रगात लालच हाय नव्हं? जातपात कुठं रायलीय का मेल्या आता?' असे म्हणत नयवाडीतील बाळाबाबाला माझ्या आजोबांनी चांगलंच झापलं. बाळाबाबा गावात आला की साकनं पाणी पिताना मी अनेकदा पाहिलंय. साकनं म्हणजे तांब्याला तोंड न लावता. तेव्हा मी लहान होतो. अगदी दहा-बारा वर्षांचा असेन. पण तरीही राहून राहून प्रश्न पडायचा, शेजारच्या वाडीतला बाळाबाबा आला की तो साकनं पाणी पितो आणि इतर वाडीतील कुणी आला की, तोंड लावून पाणी पितो. असं का? एकदा आजोबांना विचारलं तेव्हा कळलं की, बाळाबाबा बौद्ध होता.
-१-
रायगडच्या रोहा तालुक्यातील एक गाव म्हणजे नयवाडी. गाव कसलं, एक तीस-चाळीस घरांची वस्तीच ती. आमच्या गावापासून दोन-अडीच किलोमीटर असावी. नयवाडीला अनेकजण बौद्धवाडीही म्हणत. पण नयवाडी मूळ नाव. तिथे बौद्ध राहत म्हणून बौद्धवाडी बोलण्यास सुरुवात झाली असावी, असा माझा अंदाज आहे. नयवाडीत कधी क्रिकेट खेळायला गेल्यावर मी एक गोष्ट नेहमी पाहायचो, प्रत्येकाच्या घराच्या दारावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक फोटो असायचा. फोटो नसला तर किमान 'जय भीम' ना…

..तेव्हा संजय राऊत येतील का?

Image
प्रिय शिवसैनिकांनो,
आदरणीय संजय राऊत जहाल हिंदूत्त्वाची वगैरे भाषा करतात. पाकिस्तानला शेवटच्या श्वासापर्यंत वगैरे विरोध करु, अशी बोलून बोलून गुळगुळीत झालेले डायलॉग ते नेहमीच सामनाच्या ऑफिसमधील संपादकीय केबिनमधून मारत असतात. किंवा संसदेच्या पायऱ्यांशी उभं राहून एएनआयच्या बूमसमोर. या व अशा विधानांनी संजय राऊत गेली अनेक वर्षे सामान्य मराठी तरुणांना उसकवण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. काही प्रमाणात तो यशस्वीही झाला आहे. शाईफेक करणारे कार्यकर्ते हे त्याची फलश्रुती आहे. हिंदूत्त्वादी तरुणांनी जागे राहा, लांड्यांना थारा देण्याची गरज काय असे अनेक वादग्रस्त विधानं राऊत यांनी केले आहेत. ही विधानं तरुणांची माथी भडकावण्यासाठी पुरेशी असतात.
आता मूळ मुद्द्याकडे वळूया. तो म्हणजे पत्र लिहिण्याचे कारण. संजय राऊतांचे ऐकून आक्रमक होऊन बेकायदेशीर कृत्य करु नका. याचं कारण संजय राऊत यांना त्यांच्या विधानमुळं फार फार तर अटक होईल. पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर पीआय त्यांना सॅल्युट मारेल. तेही खुर्चीतून उठून. हाय-फाय हॉटेलचा चहा मागवला जाईल. संजय राऊत सुरका मारुन चहा पितील. खूप गरम होतंय, असं कुरमुरत पंखा फास्ट कर…

‘गोजिरवाण्या घरात’ले दिवस

Image
“काशीआक्का, रंग्या पडला. धकाड्यावरुन खाली कोसालला. मुस्काट फुटला आणि ढोपरपण. ढोपरातना रगात येतंय. तुला बोलवलायन बयनी.” धावत-पळत आलेला रामा सुताराचा पोरगा धापा टाकत काशी आक्काला सांगत होता. पोरगा पडला आहे आणि त्याला मोठी जखम झाली आहे, याची किंचितशीही चिंता चेहऱ्यावर नसलेली काशीआक्का म्हणाली, “थांब याडवडायईज यवदे. मंग यते. श्यामराव परांजपे पारसला काय बोलतोय ते बघते आणि यते पटकन. तू हो पुढं.”
हे अस्सं फ्याड गावाकडं मराठी मालिकांचं होतं. आज ते काही प्रमाणात कमी झालंय. कारण त्याच त्याच मालिका नव्या कलाकारांना घेऊन येतात. पण ही परिस्थिती एकेकेळी आमच्या गावात होती. मालिका आहेत की संसर्गजन्य रोग, असा विचार करायला लावणारे असे अनेक किस्से आमच्या गावात घडले आहेत.
2007 पर्यंतचा तो काळ असेल. तेव्हा गावातील एका दुकानदाराकडे गावातील एकमेव टीव्ही होता. संध्याकाळची कामं करुन लोक ठीक 8 वाजता ‘चार दिवस सासूचे’ आणि ‘या गोजिरवाण्या घरात’ पाहायला यायचे. रात्री 8 ते 9 ही वेळ जणून मालिकांसाठी राखिव होती, असं वाटण्याची ती परिस्थिती. ‘चार दिवस सासूचे’ आणि ‘या गोजिरवाण्या घरात’ पाहणं म्हणजे आपलं आद्य कर्तव्य असल्…

सलाम प्रेमचंद साब!

Image
हिंदी साहित्य तसं आपल्या मराठी वाचकांमध्ये कमी प्रमाणात वाचलं जातं. साहित्याबद्दल प्रचंड ओढ असणारे, इतर प्रांतात-काळात काय चाललंय याची उत्सुकता असणारे किंवा फार फार तर साहित्य क्षेत्रातील व्यक्ती यांच्यापलिकडे हिंदी साहित्य वाचलं जात नाही. मीही याला अपवाद नाही, हे इथे प्रामाणिकपणे नमूद करतो. मात्र, जे हिंदी साहित्यिक वाचले, ज्यांचं लेखन काही प्रमाणात का होईना वाचले त्यांच्यामध्ये प्रेमचंद यांचा समावेश आहे. आपल्या लेखनातून वाचकांना संवेदनशील करण्याचा मनपासून प्रयत्न करणाऱ्या प्रेमचंद यांनी माणूसपणाचा प्रचार-प्रसार केला.
लोकांना काय आवडतं हे लिहिणं म्हणजे साहित्य नव्हे, असे मानणाऱ्यांपैकी प्रेमचंद होते. जगण्यातील विसंगती, भेदभाव आणि त्यातून आलेले मानसिक ताण, दारिद्री, मनाची दुखरी बाजू, कायम गुलाम राहिलेल्या समाजाचं वास्तववादी चित्रण, हे सारं प्रेमचंद यांच्या लिखाणांचं वैशिष्ट्य.

अशा या प्रेमचंदांच्या लेखनापासून मीही वंचितच होतो. शाळेत हिंदीच्या पुस्तकात पहिला धडा प्रेमचंदाच्या गोदानमधील वगैरे असायचा. एवढाच काय तो संबंध प्रेमचंद आणि माझा. गावाकडं लायब्ररी वगैरे असली काहीच भानगड नव्हती. त्य…