Posts

Showing posts from May, 2015

दिस जातील, दिस येतील...

Image
गीतकार सुधीर मोघे यांच्या लेखणीतून जन्म घेतलेल्या या गीताने काबाड-कष्ट करुन जगणाऱ्या आणि आठरा विश्व दारिद्र्य भोगणाऱ्या शेतकरी कुटुंबाला जगण्याचं नवं बळ देऊन जातं. जगण्यात राम राहिला नाही म्हणत या जगण्याला-जगाला आणि स्वत:ला दुषणं देत काळाच्या पडद्याआड जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कित्येकांना जगण्याची उमेद देणारं हे गीत. नवx चैतन्य निर्माण करणारं गीत आहे. गीतकार एखाद्या माय-बाप शेतकरी जोडप्याला समोर उभं करुन समाजावतो आहे की काय, असे वाटावं असे हे गीत. सुधीर मोघेंसारख्या संवेदनशील गीतकाराने कदाचित असे केलेही असावे. त्यांच्या लेखणीतून साकरलेलं हे गीत म्हणजे संवेदनशील माणसाचं उदाहरणच आहे. मोघे लिहितात…
तुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं तुझ्या माझ्या लेकराला, घरकुल नवं नव्या घरामंदी काय नविन घडंल घरकुलासंग समदं येगळं होईल दिस जातील, दिस येतील भोग सरंल, सुख येईल
गीतकार कष्टकऱ्या शेतकऱ्याचं म्हणणं मांडू पाहतो आहे. निस्वार्थी, निरागस असलेल्या माझ्या शेतकरी बांधवाला फार काही नको आहे. त्याच्या अपेक्षा, त्याचे स्वप्नं हे त्याने कुवतीप्रमाणेच पाहिलेत. त्याला ना कोणतीही चौकट मोडायचीय, ना कोणत्याही मोठ्या स…

नजीब जंग कोण आहेत?

Image