Posts

Showing posts from February, 2015

वाटेत भेटणारी माणसं

Image
पूर्व प्रसिद्धी- दैनिक ऐक्य (सातारा)
आयुष्य जगत असताना कुणी एखादा असा वाटसरु येतो आणि तू असे कर, तसे कर सांगून जातो. मग आपणही त्यावर विश्वास ठेवून तसे करतो. कधी-कधी असे अचानक घेतलेले निर्णय आयुष्याला कलाटणी देणारे ठरतात. आयुष्यातले ‘टर्निंग पॉईंट’ वगैरे.
खरंच आपण आपल्या जगण्यात किंवा अगदी आपल्य आयुष्यातील नित्य निर्णय प्रक्रियांमध्ये कित्येकांना सामावून घेत असतो ना? आई-वडिलांपासून ते अगदी मगाशीच एसटी स्टँडवर भेटलेल्या एखाद्या नवख्या व्यक्तीपर्यंत. खरं पाहता, जे लोक ओपन माईंडेड म्हणजे खुल्या दिलाची वैगरे असतात, त्यांच्या आयुष्यातील निर्णय प्रक्रियांमध्ये अनेकांचा सहभाग असतोच. हा सहभाग अनेकवेळा किंबहुना नेहमीच फायदेशीर ठरत असतो. याचं कारण म्हणजे अनेकांचे अनुभव त्यांच्या एखाद्या निर्णयामागे असतात. आपण आपलं आयुष्य कितीही निवांतपणे, एकांतपणे किंवा एकटेपणाने जगण्याचा प्रयत्न केला तरी कधीना कधी ‘वाटेत भेटणारी माणसां’ची गरज भासतेच.
तीन-एक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मुंबईत नुकताच स्थायिक व्हायला आलो होतो. हातात पडेल ते काम करण्याची तयारी होती. जसा पोटाचा खळगा भरण्यावण्याचा प्रश्न डोळ्यासमोर होता,…

उत्साही तरुणांचा देश

Image
पूर्व प्रसिद्धी- दैनिक ऐक्य (सातारा)

मागील काही वर्षांपासून देशातील विविध मुद्द्यांवर तरुणाई सक्रियता दाखवू लागलेली आपल्याला दिसून येते. मीही याच तरुणाईचा एक सदस्य असल्याने तरुणांच्या भूमिकेबद्दल विवेचन करणं मला गरजेचं वाटतं. कारण देशातील विविध समस्यांविरोधात तरुणाईचा आवाज घुमणं गरजेचं असतं. तरुणाईचा आवाज परिणामकारक असतो...तरुणाईच्या आवाज क्रांतीचा हुंकार असतो...परिवर्तनाची लाट असते. मात्र, स्वातंत्र्यानंतरचं साठ-सत्तरचं दशक किंवा फार-फार तर ऐंशीपर्यंतची दशकं सोडली तर हा हुंकार फार काही दिसला नाही असे जाणकार सांगतात. मात्र आज विविध आंदोलनांमध्ये तरुणांची सक्रियता दिसते व ही सक्रियता खूप महत्त्वाची आहे, असेही समाजातील सजग नागरिकांचं मत आहे. असे म्हटलं जातं की, सज्जनांची निष्क्रियता ही दुर्जनांच्या सक्रियतेला कारणीभूत ठरत असते. त्यामुळे सज्जन तरुणांच्या सक्रियतेला पर्यायाने अधिक महत्त्व प्राप्त होतं. मात्र, गेल्या तीन-एक वर्षांपासून ‘उत्साही तरुणांचा’ मोठा सहभाग विविध आंदोलनं, निषेध मोर्चांमधून दिसून येतो. आता तुम्ही म्हणाल उत्साही तरुण म्हणजे नक्की काय म्हणायचंय? तर एखदी घटना घडल्यावर त…

हरवत चाललेलं गाव

Image
पूर्व प्रसिद्धी- दैनिक ऐक्य (सातारा)
परवा गावी गेलो होतो. तालुक्याच्या ठिकाणाहून थेट गावात जाणारी गाडी पकडली. खूप दिवसांनी गावाकडे निघालो होतो. एसटीने गावाच्या दिशेला कूच केली. शासनाच्या ह्या लाल डब्याची सफर गेली सहा-सात वर्षे केली नव्हती. आज किती वर्षांना एसटीत बसलो होतो. गाव डोंगरात असल्याने तालुक्याच्या ठिकाणाहून गाडी चढणीला लागली. एसटीतून मागे एकदा टोकावून पाहिलं...तालुक्याचं ठिकाण खूपच ओबड-धोबड वाढलेलं पाहून थक्क झालो. चार-पाच वर्षात हे शहर इतकं पसरावं, याची कल्पना नव्हती. तालुक्याचं ठिकाण शहरीकरणाच्या कचाट्यात सापडलं होतं. पाच-सहाशे दुकानं आणि घरं असलेलं तालुक्याचं ठिकाण आता पाच-सहा हजारांच्या घरात गेलंय. हळूहळू एसटी डोंगराच्या आड गेली..तालुक्याचं ठिकाण दिसेनासं झालं. चार-पाच गावांनंतर माझं गाव. प्रत्येक गावात गाडी थांबत-थांबत चाललेली.. चार गावं गेल्यानंतर गाडी उतरंडीला लागली. लांबूनच नारळीची दोन झाडं स्वागत करताना दिसली. गावाच्या वेशीवर येऊन पोहोचलो.
‘बारशेतवाले’ कंडक्टर ओरडला. मी पटापट सामान सीटवर उतरवून घेतला आणि एसटीतून उतरलो. थोडा वेळ एसटी स्टँडवरच थांबलो. गाव खूप बदलल्याचं …