अॅड. पल्लवी रेणके

अॅड. पल्लवी रेणके

एक वर्षापूर्वी म्हणजे २०१३ मध्ये TISS मध्ये भूसंपादन कायद्यावर एक परिसंवाद होता. सुलक्षणा महाजन, प्रतिमा जोशी यांसारखे दिग्गज उपस्थित होते. मी तेव्हा 'सकाळ'मध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून नुकताच रुजू झालो होतो. वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे मी या परिसंवादाला हजेरी लावली. सध्या 'राइट टू पी' मोहिमेच्या शिलेदार असेलेल्या सुप्रीया यांनी कोरो संघटनेतर्फे हा परिसंवाद आयोजित केला होता.

याच परिसंवादात मी पहिल्यांदा पल्लवी रेणकेंना भेटलो. वक्तृत्त्वात आक्रमकता, वंचित-भकटे-विमुक्तांबद्दलची आत्मियता, गोर-गरिबांबद्दलची तळमळ, तळागाळातील अशिक्षित समाजावर स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनंतरही होणारं शोषण थांबवलं पाहिजे हा ध्यास पल्लवी रेणकेंच्या वक्तृत्वात प्रकर्षाने जाणवत होता.
चळवळीतल्या नव्या पिढीची ती प्रतिनिधी आणि चळवळीत नव्याने येऊ पाहणा-यांची ती आदर्श आहे.

'आम्ही चळवळीतली माणसं. शोषणकर्त्यांच्या विरोधात शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू. भटक्या-विमुक्तांना न्याय मिळेपर्यंत लढा देऊ.' असे बेधडकपणे समोर बसलेल्या शे-पाचशे लोकांना सांगताना तिच्या मनात गोर-गरिबांबद्दल असलेली तळमळ जाणवत होती.


-  नामदेव अंजना

Popular posts from this blog

पवारांचं डोकं ठिकाणावर आहे का?

लाल डब्यातील रावतेशही

'हे' दोघे आता काय करतात?