Posts

Showing posts from January, 2015

नारायण पवार

Image
अनेकदाजनतेतकामकरणाऱ्यांनाजनतेचंप्रतिनिधित्वकरण्याचीसंधीमिळतचनाही. कधी-कधीम्हणण्यापेक्षाअनेकवेळाअसंचम्हणूया. कधीसंधीमिळालीचतरतीहीअगदीनगण्यचअसते, असेएकंदरीतचित्रआपल्याआजूबाजूलादिसूनयेतं. अशांपैकीचएकम्हणजेआमच्यागावचेमाजीसरपंचनारायणतानाजीपवार. गावाच्याविकासाचाध्यासघेऊनमुंबईतलाव्यवसायसोडूनगावीपरतलेलेनारायणपवारम्हणजेएकअवलियाच. मुळात‘शिक्षण हे श्रीमंतांनीघ्यायचंअसतं’अशीआमच्याखेडेगावतएकेकाळीशिक्षणाकडेपाहण्याचीदृष्टी

'हत्ती'ची अॅलर्जी असलेला माणूस

Image
पार्ल्यातल्या गझाली रेस्टाॅरन्टजवळ 'परमार' नावाची इमारत आहे. या इमारतीत 'शाह' आडनावाचा एक गृहस्थ राहतो. प्रचंड अध्यात्मिक मनुष्य. ज्योतीषशास्त्रावर या गृहस्थाचा इतका विश्वास की याचं भविष्य सांगणा-याला त्याच्या भविष्य सांगण्यावर नसेल. कुठल्याशा ज्योतिषाने या शाहला 'हत्ती' या प्राण्यापासून दूर राहण्यास सांगितले. जमल्यास हत्ती पाहणंही टाळायला सांगितलं. मग काय? जसं जमेल तसं हत्तीला टाळण्या़चा प्रयत्न हा गृहस्थ करत असतो.

आता हेच पाहा ना... 'टाइम्स आॅफ इंडिया'च्या लोगोमध्ये दोन हत्तींचे चित्र आहे. म्हणून या महाशयाने 'टाइम्स'चं नाव फाडून पेपर टाकण्याचे आदेश पेपरवाल्याला देऊन ठेवलेत.

कमालच आहे बुवा एक-एकाची.

-  नामदेव अंजना
अॅड. पल्लवी रेणके

Image
एक वर्षापूर्वी म्हणजे २०१३ मध्ये TISS मध्ये भूसंपादन कायद्यावर एक परिसंवाद होता. सुलक्षणा महाजन, प्रतिमा जोशी यांसारखे दिग्गज उपस्थित होते. मी तेव्हा 'सकाळ'मध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून नुकताच रुजू झालो होतो. वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे मी या परिसंवादाला हजेरी लावली. सध्या 'राइट टू पी' मोहिमेच्या शिलेदार असेलेल्या सुप्रीया यांनी कोरो संघटनेतर्फे हा परिसंवाद आयोजित केला होता.

याच परिसंवादात मी पहिल्यांदा पल्लवी रेणकेंना भेटलो. वक्तृत्त्वात आक्रमकता, वंचित-भकटे-विमुक्तांबद्दलची आत्मियता, गोर-गरिबांबद्दलची तळमळ, तळागाळातील अशिक्षित समाजावर स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनंतरही होणारं शोषण थांबवलं पाहिजे हा ध्यास पल्लवी रेणकेंच्या वक्तृत्वात प्रकर्षाने जाणवत होता.
चळवळीतल्या नव्या पिढीची ती प्रतिनिधी आणि चळवळीत नव्याने येऊ पाहणा-यांची ती आदर्श आहे.

'आम्ही चळवळीतली माणसं. शोषणकर्त्यांच्या विरोधात शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू. भटक्या-विमुक्तांना न्याय मिळेपर्यंत लढा देऊ.' असे बेधडकपणे समोर बसलेल्या शे-पाचशे लोकांना सांगताना तिच्या मनात गोर-गरिबांबद्दल असलेली तळमळ जाणवत होती…