Posts

Showing posts from September, 2014

कासाच्या माळरानावर

Image
हिरवागार निसर्ग ज्याला भुरळ घालत नाही असा माणूस सापडणं थोडं कठीणच. त्यातही जर गावाकडची हिरवळ तर प्रचंड आकर्षित करते. ऐन पावसाळ्यात गावाकडे गेलो की हिरव्या-हिरव्या माळरानावर फेरफटका मारणं, नद्यांच्या मंजुळ खळखळाटात उड्या मारणं, हिरवी चादर पांघरलेल्या डोगरांच्या चढणी चढणं किंवा कड्यांवरुन अगदी शिवरायांच्या मावळ्यांसारखं चढाई करणं हे ठरलेलंच. गेल्या सहा वर्षांपासून शिक्षणासाठी मुंबईत आल्याने गावाकडे जाणं तसं कमीच झालंय. पण गावाकडची ओढ काही कमी झाली नाहीय. आजही जेव्हा मिळेल तेव्हा गावाकडे पळणं सुरुच असतं. त्यात पावसाळ्यात तर सुट्टी आणि तीही मुंबईत हे गणीत कधीच नसतं. मुंबईतला पवसाळाही नकली वाटतो. असो.       परवा गावी गेलो होतो. काही विशेष काम वगैरे नव्हतं. पण सुट्टी आहे म्हणून गाव गाठला. ऐन पावसाळ्यात गावाला जायला मिळतंय यापेक्षा वेगळा आनंद काय? गावाकडची ओढच अशी आहे की इकडे मुंबईत काम करत असताना कुणीतरी आपल्याला जबरदस्तीने इथे डांबून ठेवलं आहे असं वाटू लागतं. त्यांमुळे सुट्टी मिळताच गावकडे पळायचं असं ठरलेलंच. असो. तर परवा गावी गेलो असताना सहजच एका संध्याकाळी गावाबाहेरच्या माळरानावर फेरफटका …