Posts

Showing posts from July, 2014

पाताळगंगा नव्हे गटारगंगा

Image
मध्यंतरी प्रचंड प्रदुषित असलेल्या पाताळगंगा नदीवर अभ्यास करण्याची मला संधी मिळाली. काही कारणास्तव हा अभ्यास मी पूर्ण करु शकलो नाही मात्र जेवढा अभ्यास केला ते मांडण्याचा प्रयत्न करतोय.... अर्थात या अभ्यासासाठी सर्वात जास्त मदत लाभली ती युसुफ मेहेर अली सेंटरची... मदन मराठे सरांना सेंटरच्या गाडीतून एमआयडीसी परिसर, पाताळगंगा नदी अशा अनेक ठिकाणी भेटी घालून दिल्या. मदन मराठे सर स्वत: 1989 च्या आंदोलनात सक्रि. सहभागी होते त्यामुळे त्यांना पाताळगंगा नदीच्या प्रदुषणाची खडानखडा माहिती आहे. नदी प्रदुषण होताना समोर दिसतंय शिवाय त्यावर जालिम उपाय असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मदन मराठे सरांसोबतचा अनुभव ग्रेट होता...त्यांच्यासोबत आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी पाड्यांनाही भेटी देता आल्या... इमेल आयडी चेक करत असताना हा रिपोर्ट हाती लागला. पातळगंगा नदी प्रदुषणावर काम करत असलेल्यांना कदाचित यातून काही लिंक मिळू शकेल...त्यासाठी मी थोडक्यात तयार केलेला रिपोर्ट इथे देत आहे... एकीकडे पाण्याचा प्रश्न दरवर्षी पाचवीला पुजलेला असतानाच त्याचवेळी दुसरीकडे नदी प्रदुषणामुळे नदीच्या नदी वाया जाण्याचे भयानक च…