आमच्या गावाचे सरपंच : नारायण पवार

नारायण पवार (सरपंच)
नारायण पवार..... आमच्या गावाचे माजी सरपंच... गावाच्या विकासाचा ध्यास घेतलेला माणूस... व्यवस्था परिवर्तनाच्या फक्त बाता न मारता नारायण अण्णा स्वत: व्यवस्थेचे एक भाग झाले... तशी त्यांची ओळख मंञालयापर्यंत..ओळखीचा वापर करुन महत्वाचं पद पदरात पाडून घेता आलं असतं पण त्यांनी तसे केले नाही... गावात विकास करायचा असे ठरवून त्यांनी मुंबईहून सरळ गाव गाठला आणि लोकशाही पद्धतीने निवडणूक जिंकून सरपंच झाले... मराठीसह इंग्रजी, हिंदी भाषेवरही उत्तम कमांड... उगाच नको ते आणि नको तिथं बोलण्यापेक्षा मोजकं बोलण्यावर भर... एखादी तक्रार घेऊन गावातील कोणी आलाच तर त्याची बाजू नीट समजून घेऊन, सर्व बाजू नीट तपासून निर्णय घेण्याची पद्धत... शासनाच्या विविध योजना गावातील लोकांपर्यंत पोहचवण्याच्या त्यांच्या कामाला तर मला खरच दाद द्यावीशी वाटते कारण हर एका योजनेचा संपूर्ण अभ्यास करुन लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात... सरपंच पदाच्या पहिल्या टर्ममध्ये एवढं उत्तम काम केलं की त्यानंतरच्या टर्ममध्ये त्यांची बिनविरोध निवड झाली... गावाचा कायापालट करण्याचा ध्यास घेतलेले आमचे नारायण अण्णा रायगड जिल्हा पञकार संघाच्या 'उत्कृष्ट सरपंच' पुरस्कारानेही गौरवले गेलेत.... सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी असते हे त्यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले आहे.. गावातील एक तरुण म्हणून त्यांचा नेहमीच अभिमान वाटतो..
शिक्षणासाठी सदा आग्रही...शिकत असलेल्या प्रत्येकाला ते प्रोत्साहन देतात.. शिकताना जी काही मदत लागेल ती सांग, जमेल तशी मदत करेन हे त्यांचं वाक्य काम करुन शिकत असताना खूप आधार देणारं वाटायचं... आई-वडलांसारखे ते नेहमी पाठीशी असतात... चुकलो तर हक्काने ओरडतात आणि चांगल्या कामाचं कौतुकही करतात... खरच आपल्याकडे गावागावात अशा लोकांची गरज आहे.....
Powered by Blogger.