Posts

Showing posts from May, 2014

याला ‘स्ट्रगल’ ऐसे नाव...

Image
वयाच्या तुलनेने खूपच लवकर अंगावर आलेली घराची जबाबदारी.. कुणाच्या भावाचे शिक्षण, तर कुणाच्या बहिणीचे शिक्षण.. अजारी आई-वडिलांच्या औषध-पाण्याचा खर्च, तर कधी फुटक्या नशिबामुळे आलेल्या असंख्य अडचणी अशा नानाविध जाबाबदाऱ्या वयाच्या सतरा-अठराव्या वर्षीच खांद्यावर उचलून या जीवघेण्या स्पर्धेत तग धरून राहत काम करून शिक्षण घेणारे तरुण-तरुणी या मुंबईसारख्या शहरात काही कमी नाहीत. शिक्षणाला पर्याय नाही हे चांगले ठाऊक असते, पण हातात चार पैसे आल्याशिवाय शिक्षण घेऊ  शकत नाही व घरही चालू शकत नाही हे वास्तव स्वीकारून जगाच्या या जीवघेण्या स्पर्धेत पडेल ते काम करून पैसे कमावायचे व शिक्षणसुद्धा पूर्ण करायचे आणि घराची जाबाबदारी सांभाळायची असे ठरवून सकाळी घरातून बाहेर पडलेल्या व रात्री आकारा-बारा वाजेपर्यंत अखंड मेहनत... 
जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात सध्या स्पर्धा सुरू झाली आहे. या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर या स्पर्धेत आपणही सहभागी होणे अपरिहार्य आहे. जो स्पर्धेत नाही त्याचे अस्तित्वच नाही किंवा त्याला या जगात नाव नाही असे काहीसे एक भयानक चित्र गेल्या काही वर्षापासून पुढे येताना दिसते आहे. ग…

शाळेतील पंधरा ऑगस्टचं भाषण

Image
“आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, शिक्षकवर्ग आणि इथं जमलेल्या माझ्या विद्यार्थी बंधू-भगिनींनो.. देशाच्या स्वातंत्र्याबद्दल मी जे काही दोन शब्द सांगणार आहे ते शांत चित्तेने ऐकाल अशी मला आशा आहे.....(एक दीर्घ श्वास घेवून... भाषणाची गाडी वेगात सुटते..) १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्या स्वातंत्र्यविरांपैकी एक म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर टिळक.. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच’ अशी सिंह गर्जना करणाऱ्या टिळकांचा जन्म रत्नागिरीतील चिखली या गावी झाला..... ” मग जेवढं काही पाठ केलंय धाडधाड बोलून टाकायचं आणि “धन्यवाद...जईंद जय महाराष्ट्र”... (‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ असे स्पष्ट शाळेत कुणी बोललेले आठवत नाही..अर्थात मीही नाही), असा समारोप. शाळेतल्या अर्ध्याहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थींनीच्या भाषणाची सरुवात आणि समारोप असाच असायचा. फार फार तर टिळकांच्या जागी महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर वा अन्य कोणा स्वातंत्र्यविरांचं नावं असायचं आणि त्यांचं योगदान... मात्र…

आमच्या गावाचे सरपंच : नारायण पवार

Image
नारायण पवार..... आमच्या गावाचे माजी सरपंच... गावाच्या विकासाचा ध्यास घेतलेला माणूस... व्यवस्था परिवर्तनाच्या फक्त बाता न मारता नारायण अण्णा स्वत: व्यवस्थेचे एक भाग झाले... तशी त्यांची ओळख मंञालयापर्यंत..ओळखीचा वापर करुन महत्वाचं पद पदरात पाडून घेता आलं असतं पण त्यांनी तसे केले नाही... गावात विकास करायचा असे ठरवून त्यांनी मुंबईहून सरळ गाव गाठला आणि लोकशाही पद्धतीने निवडणूक जिंकून सरपंच झाले... मराठीसह इंग्रजी, हिंदी भाषेवरही उत्तम कमांड... उगाच नको ते आणि नको तिथं बोलण्यापेक्षा मोजकं बोलण्यावर भर... एखादी तक्रार घेऊन गावातील कोणी आलाच तर त्याची बाजू नीट समजून घेऊन, सर्व बाजू नीट तपासून निर्णय घेण्याची पद्धत... शासनाच्या विविध योजना गावातील लोकांपर्यंत पोहचवण्याच्या त्यांच्या कामाला तर मला खरच दाद द्यावीशी वाटते कारण हर एका योजनेचा संपूर्ण अभ्यास करुन लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात... सरपंच पदाच्या पहिल्या टर्ममध्ये एवढं उत्तम काम केलं की त्यानंतरच्या टर्ममध्ये त्यांची बिनविरोध निवड झाली... गावाचा कायापालट करण्याचा ध्यास घेतलेले आमचे नारायण अण्णा रायगड जिल्हा पञकार …

आदिवासींवरील 'मटा'मधील लेखाच्या निमित्ताने...

Image
'आदिवासी: विकास की विस्थापन' हे मिलिंद बोकीलांचे पुस्तक काही महिन्यांपूर्वी वाचले.... या पुस्तकात 'आदिवासी म्हणजे आद्य निवासी' अशी आदिवासींची व्याख्या आहे....आद्य म्हणजे मूळचे, स्थानिक... 

माझ्या माहितीप्रमाणे देशातील जिथे जिथे आदिवासी भाग आहेत तिथे तिथे मूलभूत सुविधांचीही वणवण आहे... अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधाही त्यांना मिळत नाहीत... संगणक आणि तुमचं इंटरनेट तर त्यांच्या गावीही नाही... अर्थात काही आदिवासी पाड्यांपर्यंत या सुविधाही पोहोचल्याही असतील मात्र त्या 'काही' आदिवासी पाड्यांपर्यंतच.... याचा अर्थ आपण त्यांचा हक्क हि्रावून घेतो आहे... इथल्या स्थानिकांनाच त्यांचे हक्क मिळत नाहीत.... आदिवासींपर्यंत आपली सरकारी यंत्रणा कधी पोहोचणार आहे कुणास ठाऊक....

विशेषत: रायगड जिल्ह्यात आदिवासींची संख्य़ा मोठ्या प्रमाणावर आहे... माझ्या गावच्या आजूबाजूच्या आदिवासी पाड्यातील अनेक तरुण शिक्षण अर्धवट सोडून देतात...
दहावीनंतर लगेच मुलींचं लग्न होतं...बालवयातच लग्न...त्यामुळे पुढील आयुष्यात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतं... का आपलं या आदिवासी बांधवांकडे दुर्लक्…