Posts

Showing posts from December, 2013

किडनॅपिंगची गाडी

Image
लहान असताना आपल्याला भिती घालण्यासाठी आई-वडील विविध शक्कली लढवत असत. “झोप नाहीतर बुवा येईल” (हा बुवा म्हणजे कोण आणी तो कसा दिसतो ? या प्रश्नाचे उत्तर मला अजातागायात मिळाले नाही) किंवा “जेवलास नाही तर भूत तुला घेवून जाईल”(भुताचेही तसेच आहे, हा भूत मी आजतागायत पाहिले नाही) वैगरे वैगरे अशी अनेक वाक्य आपल्याला भीती जणू घालण्यासाठी तयारच करून ठेववलेली असतात. मात्र अशाही काही गोष्टी, प्रसंग, व्यक्ती असतात ज्यांना आपण लहानपणापासून घाबरत आलेलो असतो किंवा त्यांचा दारारा आपल्या मनात कायम राहतो. म्हणजे अनेकवेळा आपण आपल्या आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीला घाबरत असतो. मात्र अनेकदा तर काही अशां अफवा पसरतात कि आपोआपच आपल्या मानता एक प्रकारची भीती निर्माण होते आणि आपण स्वतःहूनच सावध राहत असतो.
थोड्या-बहुत फरकाने प्रत्येकाने आप-आपल्या लहानपणी अशाप्रकारचा दरारा अनुभवला असलेच. मला आठवतंय माझ्या लहानपणी “किडनॅपिंगच्या गाडी”चा दरारा.  आमचे गाव तसे डोंगराळ परिसरात. अगदीच काही कडेकपऱ्यात वसलेला नाही पण सपाट माळरानावरही नाही. आणि शिवाय गावात दिवसातून अगदी मोजक्याच गाड्या यायच्या. हल्ली अनेकांनी स्कूटर घेतल्या आ…

प्रेरणादायी व्यक्तिमत्व : सतीश काळसेकर

Image
खरंतर आयुष्यात अशा अनेक व्यक्ती असतात ज्यांच्या विचारांमधून, वागणुकीतून काही ना काहीतरी आपण शिकत असतो. असेही अनेक व्यक्तिमत्व असतात ज्यांची नुसती कौतुकाची थाप आपल्याला प्रेरणादायी ठरत असते.... अशीच एक व्यक्ती ज्यांनी दिलेले प्रोत्साहन खरच माझ्यासाठी नेहमीच मोलाचे आहेत....
मी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षाला होतो... एका कामानिमित्त भूपेश गुप्ता भवनमध्ये गेलो होतो... ज्या व्यक्तीशी काम होतं.. ती व्यक्ती तिथे भेटणार होती... मी व माझा मित्र आकाश लोणके असे आम्ही दोघेजण गेलो होतो... भूपेश गुप्ता भवनच्या दुसऱ्या मजल्यावरगेलो.... उजव्या बाजूला एक केबिन दिसली... आतील एकाने विचारले “कोण हवे आहेत ? काही काम आहे का ?” मी त्यांना सविस्तर सांगितले कि असे असे काम आहे..यांना यांना भेटायचे आहेत... “ठीक आहे.. बाजूला जी केबिन आहे तिथे बसलेत बघा ते ज्यांना तुम्हाला भेटायचे आहे...” ते म्हणाले. आम्ही दोघेही बाजूच्या केबिनच्या दिशेने गेलो. आत केबिनमध्ये सफेद रंगाच्या कुर्ता-पायजमा परिधान केलेला अंगाने धडधाकट आणि आवाजात कणखरपणा  आणी स्पष्टपणा असलेला एक व्यक्ती. “सर, आत येवू का ?” मी विचारले. “अरे विचारताय काय ? तु…

कामवासना, नियंत्रण आणि विवेक संस्कार

Image
सध्या दिवसागणिक महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. माध्यमांच्या पाठपुराव्यामुळे त्यातल्या काही पिडीत महिलांना न्याय मिळतही असेल पण खरतर माध्यमांपर्यंत काही मोजक्याच घटना पोहचतात. अशा असंख्य भगिनी या देशात असतील ज्या लैंगिक छळाला बळी पडत असतील. काही धाडसी भगिनी या अत्याचाराविरुद्ध लढतात तर अनेकजणी सहन करतात हे अत्याचार. अत्याचार करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे मात्र त्याचवेळी आपण हे ही लक्षात घेतले पाहिजे कि शिक्षा दिली म्हणजे यापुढे महीलांवर अत्याचार होणे थांबतील असा अर्थ काढणे मूर्खपणाचे आहे. त्यामुळे यावर कायदेशीर शिक्षेसोबतच अजून दुसरा कोणता उपाय असेल तर तो म्हणजे लैंगिक शिक्षण देणे आवश्यक आहे.
अगदी स्पष्ट बोलायचे तर स्त्रियांचे गुप्तांग अनेकवेळा आपण शिव्या म्हणून वापरतो. का असे आपण करतो ? ज्या अवयातून आपला जन्म झाला आहे त्याला आपण त्याच्याशी एखादा टोकाचे हिंस्त्र कृत्य कसे करू शकतो ? असे अनेक प्रश्न मला पडले आहेत. यावर एक उत्तर असे आहे कि असे हिंस्र कृत्य करणाऱ्यांचे स्वतःच्या मेंदूवर नियंत्रण नसते. कामवासना ही एक प्रबळ अशी वासना आहे पण याचा अर्थ ती नियंत्रणात ठ…