Posts

Showing posts from November, 2013

...आणि शाळेची ती अवस्था पाहून डोळे पाणावले.

Image
परवा मुंबईला येताना एसटी पकडण्यासाठी जिथे एसटी थांबते तिथे आलो... एसटी यायला थोडा वेळ होता म्हणून जवळच असलेल्या माझ्या प्राथमिक शाळेच्या दिशेने गेलो... शाळेच्या दिशेने जाताना शाळेतल्या दिवसातील अनेक गमती-जमती, मजा-मस्ती या साऱ्यांची आठवण झाली... शाळेच्या वऱ्हांड्यात पाऊल ठेवला... मन भरून आलं.. याच वऱ्हांड्यात एकेकाळी दंग मस्ती केली होती... दुपारच्या जेवणाला याच वऱ्हांड्या पंगती लावल्या होत्या... मनातल्या मनात मीच मला विचारलं “ओळखत असेल का वऱ्हांडा मला?”... मग माझ्याच मनाने उत्तर दिले “का नाही ? नक्की ओळखत असेल... भले तू या शाळेला विसरला असशील कदाचित. मात्र हि शाळा अजूनही तुम्हा विद्यार्थ्यांची आठवण काढते.”... शाळेच्या खिडकीचे दरवाजे हळूच उघडले.. खिडकीतून शाळेत डोकावून पहिले तेव्हा दिसलेले चित्र खरच मन हेलावून टाकणारे होते... तीन पायावर उभा असलेला टेबल..त्याला वाळवी लागली होती..त्या टेबलाची कधीही साथ न सोडणारी लाकडी खुर्ची तीलाही वाळवी लागलेली... मागे फळा...त्या फळ्याच्या एका कोपऱ्यात शाळेची पटसंख्या, हजर विद्यार्थी आणि गैरहजर विद्यार्थी यांची आकडेवारी..तीही पुसटशी..बहुतेक एका वर्षापूर…