Posts

Showing posts from June, 2013

वाढदिवसानिमित्त पत्र.....

Image
आदरणीय
राजसाहेब ठाकरे...

तुम्ही मराठी मनाचे बुलंद आवाज आहात..महाराष्ट्राच्या अस्मितेचे एकमेव लढवय्ये...मराठी लोकांसाठी प्राण पणाला लावू शकता..तुमच्याशिवाय महारष्ट्रात पर्याय नाही...असे अनेक वाक्य सकाळी सकाळी माझ्या एका मित्राकडून ऐकले... मी हि एकेकाळी तुमचा समर्थक होतो...आणि तोही कट्टर... आणि याच कट्टरपणातून मी व माझे काही मित्र एकत्र येऊन डहाणूकर महाविद्यालयात मनसेची विद्यार्थी संघटनेची बांधणीही केली होती..अर्थात नंतर काही कारणांमुळे संघटना काही मजबूत झाली नाही..व नंतर मनसेच्या अनेक विचारांपासून दुरावत गेलो .. .असो..तर आज मी तुम्हाला पत्र लिहितो आहे त्याची अनेक कारणे आहेत... मी नेहमी सर्वांना सांगतो कि तुमच्यासारखं नेत्याची देशाला गरज आहे...पण असे सांगत असताना मी एक वाक्य नेहमी या वाक्याला जोडतो ते म्हणजे राज ठाकरेंनी प्रांतवाद सोडून दिलं पाहिजे... अर्थात त्यांच्या दृष्टीने प्रांतवाद एकदम बरोबर आहे..व हाच मुद्दा त्यांना सत्तेची चव चाखायला देणार आहे यात तिळमात्र शंका नाही....पण मला फक्त काही गोष्टी तुमच्या कानावर घालायच्या आहेत.... आता हेच बघा ना दुसऱ्या एखाद्या प्रांतातून (स्वतःच्याच द…

एक शाळा बांधली म्हणजे सर्व काही झालं असे होत नाही..........

Image
शिक्षणाचा प्रसार होण्याची अजून खूप गरज आहे. नुसती एखाद्या गावात एखादी शाळा बांधली म्हणजे त्या गावात शिक्षणाचा प्रसार झाला असे म्हणता येणार नाही. आणि नुसतं शिक्षण देणे महत्वाचे नाहीत तर ते शिक्षण घेतल्यावर पुढे कोण-कोणत्या संधी उपलब्ध आहेत ? याचीही माहिती विद्यार्थ्यांना देणे आवश्यक असते. शिक्षणाचा प्रसार व्हायला हवा व त्यासाठी सरकारने व आपल्या सुशिक्षित समाजाने प्रयत्न करायला हवे हे आता वेगळे सांगायला नको. शिक्षण कसा आहे ? आजच्या शिक्षणाची गुणवत्ता काय आहे ? यावर काही दिवसांच्या अंतरावर वृत्तपत्र, दृक्श्राव्य माध्यमे यांमधून चर्चा होतंच असते. पण मला यापेक्षा थोडा वेगळं मुद्दा मांडायचा आहेअ व तो ही माझ्या अनुभवावर आधारित.... माझ्या गावाच्या आजूबाजूच्या वीस-पंचवीस गावांनी मिळून आमच्या शाळेची स्थापना केली. अर्थात माझ्या शाळेला आता सरकारी अनुदान मिळतं पण त्या अनुदानासाठीही हजार खेपा घालाव्या लागतात. अर्थात अनुदानासाठी म्हणा किंवा इतर कोणत्याही सरकारी कामासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात यात काही नाविन्य नाही. पण मी ज्या शाळेत शिकलो तिथले असे अनेक अनुभव मला महत्वाचे यासाठी वाट…

एकांत...

Image
त्यांना तुमची सोबत नको असते.. त्यांना हवा असतो एकटेपणा....एकांतवास...
कधी कोणी रागावलं... एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करूनही पराभव पत्करावा लागला..कि आपण निराशेच्या खाईत लोटले जातो. सारखं सारखं त्याचं गोष्टीचा विचार करत बसतो. तेच तेच विचार पुन्हा पुन्हा आपल्या डोक्यात येत राहतात. आजूबाजूला आपल्याला कुणीच नको असतं..अन्यथा त्याच्यावर आपला राग निघतो. जी लोकं खरच रागिट असतात ते आपली निराशा कुठल्यातरी निर्जीव वस्तूची आपटाआपट करुन व्यक्त करतात. पण त्यांची गोष्ट वेगळी असते जे आपली निराशा व्यक्त करण्यासाठी एकांतवासाचा पर्याय निवडतात. मला त्या लोकांबद्दल नेहमी अप्रूप वाटत आलं आहे जी लोकं आपल्याला आलेली निराशा काळ्याकूट्ट काळोखाशी व्यक्त करतात. तो काळोखही शांतपणे त्या व्यक्तीची भूमिका ऐकून घेतो. एकांतवासाता व्यक्त होणाऱ्या व्याक्ती ह्या खूपच संवेदनशील असतात... का बरं वाचत असावं त्यांना की आपलं ऐकणारं कोणाच नाही ? की त्यांना या जगात कोणावर विश्वासच राहिलेला नसतो ? माहित नाही बुवा... पण एक नक्की की त्यांना त्या एकांतातल्या काळोखावर त्या क्षणाला खूप विश्वास असतो. इतका की त्या एकांतात ते तासनतास …