Posts

नय्यर साब

Image
कुलदीप नय्यर काय करायचे की, वाघा-अटारी सीमेवर जायचे. दरवर्षी १४ किंवा १५ ऑगास्टला. आणि तिथे जाऊन मेणबत्त्या लावायचे. हे गेली पंधरा - सोळा वर्षे सुरू होते. यामागे उद्देश एकच - भारत आणि पाकिस्तान या दोन देशात शांतता प्रस्थापित व्हावी. किती छोटीशी कृती, पण किती उदात्त अर्थाचा संदेश! आज कुलदीप नय्यर यांचं निधन झालं. आता यापुढे सीमेवर जाऊन मेणबत्त्या पेटवून शांततेचा संदेश कोण देईल की नाही, ते माहित नाही. पण १४ आणि १५ ऑगस्टला वाघा अटारी सीमा 'कुलदीप नय्यर' नावाच्या शांतीदूताची वाट पाहत राहील, एवढं नक्की. स्वातंत्र्यपूर्व भारतात जन्म. आता पाकिस्तानात असलेलं सियालकोट हे जन्मगाव. वयाच्या पंचविशी-तिशीत फाळणी झाली. त्यामुळे फाळणीच्या जखमा झाल्या, त्यावेळी ते जाणते होते. दोन्हीकडील लोकांचे अश्रू त्यांनी पाहिले होते. कदाचित म्हणूनच या दोन देशांनी शांततेत राहावे, यासाठी मरेपर्यंत त्यांचा जीव तुटत राहिला. दोन वर्षांपूर्वी अरुण शेवते सरांच्या ऋतुरंग दिवाळी अंकात फाळणीचा अनुभव कुलदीप नय्यर यांनी कथन केला आहे. वाचताना अंगावर काटा येतो. काय तो थरार!!! कितीतरी ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार होता हा माण…

गुरुदास कामत : विद्यार्थी नेता ते केंद्रीय मंत्री

Image
ऑफिसमधून घरी येताना शेअर टॅक्सीने येत होतो. अंधेरीहून निघाल्यानंतर पुढे गोरेगावपर्यंत बोरीवलीकडे जाणाऱ्या मार्गावरील स्ट्रिट लाईट पोलवर बॅनर अडकवले होते. राजीव गांधींचा मोठा फोटो आणि खाली उजव्या कोपऱ्यात गुरुदास कामत यांचा छोटासा फोटो. टॅक्सीत असल्याने बॅनरवरील मजकूर नीट वाचता येत नव्हते. बॅनरवर काय लिहिले होते ते, कळत नव्हते. पण आजच गुरुदास कामत यांचं निधन झाल्याची बातमी करुन आलो होतो. त्यामुळे मनात अंदाज लावला, गुरुदास कामत यांना श्रद्धांजली अर्पण करणारे पोस्टर असतील. पण विचार आला, मग राजीव गांधी का पोस्टरवर? स्थानिक कुणीतरी कार्यकर्ते असायला हवे होते. पुढे एका ठिकाणी ट्राफिकमध्ये अडकलो, तेव्हा बॅनरवरील मजकूर वाचला. तर ते बॅनर राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त (20 ऑगस्ट) आदरांजली अर्पण करणारे होते. गुरुदास कामत यांनीच लावलेले. गुरुदास कामत हे राजीव गांधी यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. असे म्हटले जाते की, गुरुदास कामत युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना राजीव गांधी मुंबईत दौऱ्यानिमित्त आले की, त्यांची गाडी चालवण्यापासून सर्व पाहत असत. (या पोस्टसोबत जोडलेला फोटो पाहू शकता. यातही युवक काँग्…

स्पायडर आणि मसणजोगी

Image
ढसाळ लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये सविता प्रशांत यांची ‘मसणवाटा’ डॉक्युमेंट्री पहिली होती. त्यानंतर आणखी माहितीसाठी शोधाशोध केली होती, त्यावेळी प्रशांत पवार यांचा दिव्य मराठीत प्रसिद्ध झालेला लेख वाचला. आमच्या गावाकडं (रोहा-रायगड) मसणजोगी समाज नाही, त्यामुळे ते भयंकर अन् विदारक जीणं कधी पाहिलं नव्हतं, त्याबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे डॉक्युमेंट्री पाहिल्यावर आणि नंतर प्रशांत पवारांचा लेख वाचल्यानंतर अधिक अस्वस्थ वाटलं होतं.
“आम्ही लोकांच्या मरणाची वाट पाहत असतो. कारण कुणीतरी मेला, तर आमच्या पोटाला अन्न मिळण्याची तजवीज होणार असते”, अशा आशयाचे संवाद त्या डॉक्युमेंट्रीमध्ये ऐकल्याचे आठवते.
मसणजोगी हा भटक्या जमातींपैकी समाज. गावकुसाबाहेर पालावरचं त्यांचं जगणं. अंत्यविधीसाठी लाकडं पुरवण्यापासून सरण रचण्यापर्यंतची कामं हा समाज करतो. स्मशाणातच झोपडी बांधून, मसणवट्याची राखण करतो. मेलेल्या व्यक्तीचे कपडे, वस्तू हक्काने मागून ते वापरतात. त्यांना त्यात काहीही वावगं किंवा भितीदायक वाटत नाही. कारण तेच मसणजोगी समाजाचं जगणं बनलंय. एकंदरीत जिथे इतर माणसांचा मृत्यू होऊन शेवट होतो, तिथून मसणजोगी समाजातील लोक…

वारी : काही आठवणी आणि काही प्रश्न

Image
मूळ नाव ज्ञानेश्वर, शाळेत दाखल करताना आजोबांनी ज्ञानदेव सांगितलं, लिहिणाऱ्याने नामदेव लिहिलं...असा माझ्या नावाचा प्रवास. पण ज्ञानेश्वर असो, ज्ञानदेव असो, वा नामदेव. तिन्ही नावं वारकरी संप्रदायाशी संबंधित आहेत. नाव ठेवण्यामागे अर्थात आजोबांचं वारकरी संप्रदायातील असणं कारणीभूत आहे. लहानपणापासून घरात - गावात - पंचक्रोशीत वारकरी संप्रदायाबद्दल प्रमाणिक श्रद्धा आहे. आधी केवळ देव-धर्म म्हणून वारकरी संप्रदायाबद्दल आदर होता, मात्र पुढे तुकोबा वाचल्यानंतर विचारानेही या परंपरेशी जोडला गेलो. तमाम संतांच्या जीवनातून बंधुभावाचीच शिकवण दिली गेलीय. आपण किती अंगीकारली हा पुढचा वादाचा मुद्दा. पण संतपरंपरा ही एकता आणि बंधुभावावर आधारलेली आहे, एवढे निश्चित.
चौथीत असताना माझ्या हट्टामुळे आणि सहावीत असताना आजोबांनी स्वत:हून - अशा दोनवेळा आजोबांनी पंढरीची वारी घडवली. वारीशी संबंधित एक रंजक आठवण आहे. आजोबांचं बोट धरुन पंढरीच्या डेपोत एसटीतून उतरल्यावर घोषणा ऐकायला आली - "यात्रेचा काळ आहे. चोरांचा सुळसुळाट आहे. आपापल्या बॅगांवर लक्ष ठेवा." घोषणा ऐकून आजोबा कुजबुजले, "आम्हीही चोरीच करायला आलोय - …

जगण्याचा प्रश्न

Image
जात, धर्म इत्यादी भावनिक मुद्देच बहुतांशवेळा आपल्याकडील निवडणुकांच्या केंद्रस्थानी पाहायला मिळतात. विकास हा मुद्दा तोंडी लावण्यापुरता राहतो. जगण्याची तारांबळ असताना, आपल्याला जाती-धर्मात विभागले जाते आणि आपण विभागलो जातो - असे का होते? हे एक न सुटणारे कोडे आहे. किंबहुना मानसिक संशोधनाचा हा विषय आहे. असो.
आज 'आरोग्य' या विषयावर बोलू. किती किचकट शब्द वापरला ना - 'आरोग्य'. जात किंवा धर्मावर बोलू म्हटले असते, तर मांड्या सरसावून आणि बाह्य थोपटून पुढे आला असतात, तेही डोळ्याचे कान आणि कानाचे डोळे करुन. आपली गरज काय नि आपण करतो काय, हे न समजल्यामुळेच आपली ही हालअपेष्टा झालीय आणि यापुढे होणार आहे.
ज्यांना शक्य आहे, त्यांनी माझ्या या लेखाच्या शेवटच्या शब्दापर्यंत सोबत राहा. काहीतरी महत्त्वाचे माझे सांगणे आहे.
दहा-एक दिवसांपूर्वी 'लॅन्सेट' या जगप्रसिद्ध मासिकात अरोग्यासंदर्भात एक यादी प्रसिद्ध झाली. खरंतर अशा कित्येक मासिकांमध्ये कित्येक विषयांवरील याद्या प्रसिद्ध होत असतात. पण लॅन्सेट या मासिकाचे आरोग्य क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. 1923 पासून हे मासिक केवळ आरोग्य क्ष…

मोदी आणि त्यांचे कुत्रे

Image
राहुल गांधी यांनी कुत्र्यांकडून देशभक्तीचे धडे शिकायला हवेत, असे कर्नाटकातील बगलकोटमध्ये मोदी बोलतात आणि भाजपचे बगलबच्चे टाळ्या वाजवतात. वाह... काय ती देशाच्या पंतप्रधानाची भाषा आणि काय तो देशाच्या जनतेचा प्रतिसाद!

एकीकडे संस्कृतीचा ठेका घेतल्यासारखे टेंभा मिरवायचा आणि दुसरीकडे वैफल्यग्रस्तासारखे विकृत वागायचे, अशा दोन दगडावरील मोदींची सर्कस ज्या चमत्कारिकरित्या वर्तमानात सुरु आहे, ते पाहता 2024 काय 2050 पर्यंत त्यांची सत्ता अबाधित राहील, यात शंका नाही. पण प्रश्न सत्तेचा नाही, प्रश्न आहे नैतिकतेचा, खऱ्या संस्कृतीचा आणि खरेपणाचा. दुर्दैवाने, नेमकी याच गोष्टींची मोदींच्या संस्कृतीत कमतरता दिसून येते.

विकास वगैरे गोष्टी होत राहतात. कुठल्याही देशाची ओळख फक्त त्या देशाच्या जमिनीवरील चकाकी पाहून ठरत नसते, तर तिथलं समाजकारण, राजकारण, संस्कृती इत्यादी गोष्टींचा मिलाफ म्हणजे त्या देशाची ओळख असते. याच गोष्टींचा भुस्काट करुन विकासाच्या गोष्टी करणार असाल, तर त्या केवळ बाताच ठरतात.

अर्थात, मोदी आणि कंपनीची देशभक्तीची व्याख्याच वेगळी आहे म्हणा. त्यामुळे प्रश्न खरेतर तिथेच निकालात न…

वाचनप्रवास

Image
काही महिन्यांपूर्वीचा फोटो आहे हा. आता आणखी एक थर वर बांधला आहे. मी फार निवडक पुस्तकं खरेदी केली आहेत. कथा, लोककथा, प्रवासवर्णन, कादंबरी, कवितासंग्रह, वैचारिक लेखसंग्रह, आत्मचरित्र इ. पुस्तकांनी भरलेला असा हा माझा किताबखाना आहे.
कुणाला नाटक पाहायला आवडतं, कुणाला सिनेमा, कुणाला मुशाफिरी, तर कुणाला आणखी काही. पोटा-पाण्याच्या धबाडग्यातून बाहेर पडून, आवडत्या गोष्टीत मन रमवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. तसाच माझाही. मला पुस्तकं वाचायला आवडतात. खूप खूप आवडतात. इतकं इतकं वाचायला आवडतं, की मॅक्झिम गॉर्कीची भलीमोठी ‘आई’ कादंबरी एका बैठकीत संपवलीय.
दहावीपर्यंत पाठ्यपुस्तकांपलिकडे ‘श्यामची आई’ वगळता फार काही वाचले नव्हते. तसेही गावी कथा-कादंबऱ्यांसारखी पुस्तके नसायची. आमच्या शाळेलाही लायब्ररी वगैरे नव्हती. आताही एका कपाटाची आहे. त्यामुळे अभ्यासापलिकडे वाचन व्हायचं नाही.
अकरावीपासून पुढील शिक्षणासाठी मुंबईत आलो आणि अर्थात पावलं कॉलेजच्या लायब्ररीकडे वळली. म. ल. डहाणूकर कॉलेजला असतानाही फार अवांतर वाचन झालं नाही. एकतर पार्ट टाईम जॉब, त्यात इंग्रजीतून सर्व विषय आणि नाट्य मंडळात जाणारा वेळ. या साऱ्य…